सहकारी बँकांवर केंद्र सरकारची 'दादागिरी'; अजित पवारांनी दिली तंबी

बारामती सहकारी दूध संघाने शहरातील खंडोबानगर येथे नव्याने उभारलेल्या नंदन पेट्रोल पंप, सीएनजी गॅस पंप व नंदन मिल्क पार्लरचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले
ajit pawar
ajit pawarSakal Media

माळेगाव : शेतकऱ्यांसह लहानमोठ्या उद्योजकांना अर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी बारामती दूध संघ, जिल्हा बॅंकेसारख्या आगगण्य सहकारी संस्था मोलाचे योगदान देतात. याचे उत्तम उदाहरण खरेतर पुणे जिल्ह्यात दिसते. विशेषतः जिल्हा बॅंकेसारख्या आग्रगण्य सहकारी संस्थांच्या स्वायत्तेबाबत सध्याला अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणामुळे सहकारी बॅंक चालविण्याचा अधिकारच कमी होताना दिसतो.  त्यामुळेच आम्ही बॅंकांच्या कारभारामधील केंद्र सरकारचा नको तेवढा हस्तक्षेप टाळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला.

बारामती सहकारी दूध संघाने शहरातील खंडोबानगर येथे नव्याने उभारलेल्या नंदन पेट्रोल पंप, सीएनजी गॅस पंप व नंदन मिल्क पार्लरचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी केंद्र सरकारविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव साखर कारखान्याचे प्रमुख बाळासाहेब तावरे होत. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमेश्वर कारखान्याचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे प्रशांत काटे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते, टोरेन्ट गॅस कंपनीचे श्रीधर ताम्रपर्णी, सचिन सातव, योगेश जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, प्रमोद काकडे, दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ढोपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ajit pawar
'मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आलीय'; पंजाब काँग्रेसमध्ये उडणार भडका

दरम्यान, केंद्र सरकारचा सहकारी वित्तीय संस्थांच्या कारभारामध्ये नको तेवढा हस्तक्षेप वाढल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून देताना श्री. पवार म्हणाले, "महाराष्ट्रात पहिल्या पाच बॅंकांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंक, सातारा बॅंकेचा समावेश होतो. असे असताना या बॅंकेमधील अर्थव्यवस्थाच स्वतःच्या ताब्यामध्ये यावी, या उद्देशाने केंद्र प्रयत्न करीत आहे. परंतु त्यामध्ये कायदे तंज्ञांनाच सल्ला, सरकारच्या सहकार विभागाच्या मदतीने केंद्राच्या धोरणाविरुद्ध कसे जायचे याबाबत गांभिर्याने विचार करतो आहे."

ajit pawar
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

"बारामती दूध संघ हा सहकारी तत्वावर चालतो, तरीही हा संघ खागजी सोनाई, रियल डेअरी सारख्या खासगी प्रकल्पांच्या दराशी स्पर्धा करतो. बारामतीच्या दूध उत्पादकांना खासगी संस्थांच्या तुलनेत अधिकचे दोन पैसे देण्यासाठी संघ प्रशासन सातत्याने प्रय़त्न करीत आहे. त्यामध्ये नंदन मिल्क पार्लरसारखे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, तसेच पेंट्रोल पंप, गॅस पंपासारखे नवे व्यवसाय उभारले आहेत. यापुढे संघाच्यावतीने पशुखाद्य कारखान्याचे महत्वकांक्षी विस्तारिकण हाती घेण्यात येणार आहे,  तसेच दूध पावडर प्लॅंटचा नविन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. आजवरच्या दूध संघाच्या प्रगतीमध्ये पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकारी व कामगारांचाही वाट खूप महत्वाचा ठरतो," अशी माहिती पवार यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. अनिल धुमाळ यांनी केले, तर आभार संचालक तानाजी खोमणे यांनी मानले.

कोरोनातून लोकांचे जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी शिवसेनेचे नेते व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी व काॅग्रेस पक्षाचे सरकार मनापासून काम करीत आहेत. शेवटी सामान्य मानसाच्या जगण्यासाठी त्याच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याचे काम सरकारचे आहे. ते आम्ही करण्यासाठी रात्रीचा दिवस एक करीत आहे, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com