उरुळी कांचन शहरात बंदसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी रस्त्यावर   

All party leaders joined to maharashtra band at uruli kanchan pune
All party leaders joined to maharashtra band at uruli kanchan pune

उरुळी कांचन - मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण मागणीसंदर्भात चालु असलेल्या आंदोलनात (कायगाव जि. औरंगाबाद) येथील गोदावरी नदीत प्राण गमवावा लागलेल्या काकासाहेब शिंदे या आंदोलकांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. 24) शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्युस कारणीभुत राज्य सरकार असल्याचा आरोप करीत सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी उरुळी कांचन शहरातील मराठा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंदच्या आवाहनास ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत शहरात १०० टक्के बंद यशस्वी ठरविला. 

मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंद हाकेस प्रतीसाद देत, उरुळी कांचन येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उरुळी कांचन बंद चा निर्णय घेतला. बंद पाळण्यासाठी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अत्यावश्यक सेवा व शैक्षणिक संस्था यांना वगळळता शहरातील स्रव प्रारचे व्यवहार बंद करण्यासाठी व्यापारी वर्गाला अवाहन करण्यात आले. त्यानंतर सकाळपासून शहरातील सुरूळीत झालेले व्यवहार बंद अवाहनानंतर सकाळी १० नंतर बंद झाले. घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी देविदास कांचन, बाळासाहेब कांचन, काळुराम मेमाणे, अजिंक्य कांचन, अमितबाबा कांचन, भाऊसाहेब कांचन, युवराज कांचन, विजय मुरकुटे, शरद खेडेकर, राजेंद्र बोरकर, सागर कांचन, सुभाष बगाडे आदींनी गावात फेरी काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. 

दरम्यान बहुजन क्रांती मोर्चाचे हवेली तालुका समन्वयक श्रीकांत ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत भिसे, सुभाष जवळकर, शरद शिवरकर, रामा भंडारी, कदमवाकवस्तीच्या ग्रामपंचायत सदस्या रुपाली कोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कदमवाकवस्ती परीसरातून रॅली काढून मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दर्शविला. यावेळी श्रीकांत ओव्हाळ त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या संबधीचे निवेदनही पोलिसांना दिले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com