नाराज गट शनिवारी आठवले यांना भेटणार

नाराज गट शनिवारी आठवले यांना भेटणार

पुणे - लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अशोक कांबळे हेच खरे अध्यक्ष आहेत, असे जाहीर करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दुसऱ्या गटाला येत्या शनिवारी (ता. २१) वेळ दिली आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदावरून पक्षातील वाद मिटला असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात तो मिटला नसल्याचे समोर आले आहे.

शहराध्यक्षपदावरून रिपब्लिकन पक्षामध्ये फूट पडली आहे. दरम्यान, अशोक कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत जाऊन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची भेट घेतली. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कांबळे हेच शहराध्यक्ष असल्याचे आठवले यांनी मान्य केल्याचा दावा कांबळे यांच्या गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या गटाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

महेंद्र कांबळे म्हणाले, ‘‘शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला शनिवारी भेट देण्याचे आठवले यांनी मान्य केले आहे. या भेटीनंतर शहराध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होणार आहे. मुंबई भेटीत आठवले यांनी अशोक कांबळे यांना मान्यता दिलेली नाही. परंतु, त्यांच्या समर्थकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे. ‘तुम्ही एकत्र बसा आणि निर्णय घ्या,’ अशा सूचना आठवले यांनी दिल्या आहेत. शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हिमाली कांबळे, महेश शिंदे, संगीता आठवले, असित गांगुर्डे, बाबूराव घाटके, शशिकला वाघमारे भेटणार असून, आम्ही आमची बाजू मांडणार आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com