नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा नसल्यास उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पुणे : ""केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे; पण हा निर्णय देशहिताचा नाही, असे लक्षात आले, तर पुन्हा एकदा रामलीला मैदानावर बसण्याची तयारी करेन,'' अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी उपोषणाचा इशारा दिला.

पुणे : ""केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे; पण हा निर्णय देशहिताचा नाही, असे लक्षात आले, तर पुन्हा एकदा रामलीला मैदानावर बसण्याची तयारी करेन,'' अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी उपोषणाचा इशारा दिला.
एका कार्यक्रमानिमित्ताने हजारे पुण्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नोटाबंदीबाबत हजारे म्हणाले, ""या निर्णयाचे मी सुरवातीलाच स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काळ्या पैशाबाबत आम्ही बोलत होतो. या सरकारने आमचे बोलणे मनावर घेतले आणि हे धाडसी पाऊल उचलले. नोटाबंदीचा निर्णय हा खूप मोठा आहे. त्याच्या अंमलबजावणीत काही उणिवा नक्कीच राहू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी.''

नोटाबंदीच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांनी आक्षेप घेतले होते. यावर हजारे यांनी "ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाच्या नोटा लोकांना दिसत आहेत', अशी टिप्पणी केली. या निर्णयाबाबत कोण काय म्हणतेय, हे महत्त्वाचे नाही. यातून देशाचे हित साध्य होणार आहे, असे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे या निर्णयाच्या पाठीशी राहायला हवे. सुरवातीला आपल्या सर्वांना थोडा त्रास होईल; पण या निर्णयामुळे पुढच्या सहा महिन्यांनंतर येणारे निकाल खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, असेही हजारे यांनी सांगितले.

पुणे

पुणे : 'प्रत्येक प्रभागात योग केंद्र', 'ऍमिनिटी स्पेसचा सुयोग्य वापर', 'पारदर्शक, गतीमान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार', '...

02.12 PM

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व...

11.27 AM

वारजे माळवाडी : येथील गिर्यारोहक पद्मेश पांडुरंग पाटील (वय 33) 15 ऑगस्ट रोजी लेह येथे गिर्यारोहण करताना दरीत पडला. त्याला...

09.18 AM