वार्षिक सवलत एसटीकडून बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तेरा वर्षांपूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेली "वार्षिक सवलत कार्ड योजना' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे विभागातील सुमारे आठ हजार कार्डधारक प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. या प्रवाशांना आता संपूर्ण पैसे देऊन तिकीट घ्यावे लागणार आहे. मात्र, 22 एप्रिलपूर्वी या सुविधेअंतर्गत पास घेतलेल्या प्रवाशांना पासची मुदत संपेपर्यंत त्याचा लाभ घेता येणार आहे. 

एसटी महामंडळाने 2003 मध्ये प्रवासी संख्या वाढविण्याच्या उद्देशाने वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली होती. या योजनेत एका वर्षासाठी दोनशे रुपये शुल्क आकारून सवलत कार्ड दिले जात होते. या कार्डद्वारे किमान 18 कि.मी.पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एकूण तिकिटाच्या रकमेवर 10 टक्के सवलत दिली जात होती. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. याद्वारे महामंडळाला एकरकमी उत्पन्न प्राप्त होत होते. 

मात्र, एसटीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाच्या संचित तोटाही सातत्याने वाढत आहे. सद्यःस्थितीत महामंडळाचा वार्षिक संचित तोटा 1800 कोटी रुपये आहे. त्यामुळे तोटा रोखण्यासाठी प्रवाशांची सवलत योजना रद्द करण्याचा निर्णय  महामंडळाने घेतला, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.