पुणे : कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदार वाड्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि नगर अभियंता यांना भेटूनदेखील अद्यापही दाद मिळत नसल्याची कैफियत सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी 'सकाळ'कडे मांडली.
त्या म्हणाल्या, ''ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून वाड्याची नोंद आहे. वाड्याशेजारी बाळकृष्ण सोनईकर यांचे घर आहे. सोनईकर यांनी केलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याने ते महापालिकेतर्फे पाडण्यात आले आहे. परंतु बांधकाम पाडत असताना मुजुमदार वाड्याच्या एका बाजूच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे या संबंधी तक्रार दिली होती. सोनईकर यांनी केलेल्या बांधकामामुळेच वाड्याला धोका पोचला असून, तुम्ही त्यांच्याकडूनच डागडूजी करवून घ्यावी, असे नगर अभियंत्यांनी सांगितले.''
''वाड्याची डागडुजी करून देण्यास सोनईकर तयार नाहीत. शनिवारवाड्याच्या आसपास शंभर मीटर परिसरात नव्याने बांधकाम करता येत नाही. सोनईकर यांना फक्त दुरुस्तीची परवानगी दिली होती. तरीही त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले. वाड्याची डागडुजी करण्याएवढी आमची आर्थिक परिस्थिती नाही. वाड्याचा काही भाग कोसळल्यास नागरिकांच्याच जीविताला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष घालून मुजुमदार कुटुंबीयांना न्याय द्यावा,'' अशी मागणीही मुजुमदार यांनी केली.
वाड्याचा इतिहास
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.