शेतकऱ्यांसाठी संकेतस्थळावर माहिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) शेतकऱ्यांना उपयोगी होईल, अशी ताज्या स्वरूपाची माहिती आणि  ‘आजचे बाजारभाव’ त्वरित उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न सुरू असल्याचे सभापती दिलीप खैरे यांनी स्पष्ट सांगितले.

पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) शेतकऱ्यांना उपयोगी होईल, अशी ताज्या स्वरूपाची माहिती आणि  ‘आजचे बाजारभाव’ त्वरित उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न सुरू असल्याचे सभापती दिलीप खैरे यांनी स्पष्ट सांगितले.

समितीची www.puneapmc.org ही वेबसाइट तयार केली गेली आहे. त्याच्या मुख्य पानावर ‘प्रादेशिक कृषी बाजार समिती’ असा उल्लेख आहे. पूर्वीच्या ‘हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती’चे रूपांतर ‘प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’मध्ये केल्यानंतर हे नाव वेबसाइटवर प्रकाशित झाले. गेल्यावर्षी राज्य सरकारने पुन्हा एकदा बाजार समितीच्या क्षेत्रात बदल करून ‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती’ असे नाव निश्‍चित केले. या नावाचा बदल या वेबसाइटमध्ये केला गेला नाही. तसेच या संकेतस्थळावरील माहिती जुनी असून, नियमित शेतमालाविषयीची यादी २००६ नंतर बदलली गेली नाही. नियमित शेतीमालाच्या यादीत अनेक बदल झाले आहेत. भाजपच्या प्रशासकीय मंडळाकडे कारभार सोपविल्यानंतरही जुन्याच प्रशासकीय मंडळ, अधिकाऱ्यांच्या नावाचा यावर उल्लेख होता. तो नुकताच बदलण्यात आला आहे. 

बाजारभावाची माहिती या संकेतस्थळावर दुपारनंतरच उपलब्ध होत असते. यासर्व बाबतीत सभापती खैरे म्हणाले, ‘‘या वेबसाईटविषयीची माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आहे. ’’

सूचना, तक्रारी नोंदवता येणार
संकेतस्थळावर अधिक चांगली आणि ताजी माहिती उपलब्ध करून दिली जाईल. यात अनेक बदल केले जाणार असून, कृषी आणि पणन विभागाच्या योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. शेतकरी आपल्या सूचना, तक्रारी नोंदवू शकतील, अशी व्यवस्था करण्याचा आमचा विचार असल्याचे दिलीप खैरे यांनी सांगितले. 

पुणे

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM