शिर्सुफळच्या सरपंचपदी आप्पासाहेब आटोळे

aatole
aatole

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यामध्ये राजकीय व सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिर्सुफळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंचपदी आप्पासाहेब नामदेव आटोळे यांनी विजय मिळविला त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अतुल दिनकर हिवरकर यांचा 498 मतांनी पराभव केला.

यंदा प्रथमच थेट जनतेतुन सरपंचपदाची निवडणुक होत असल्याने चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. एकुण 3974 मतदारांपैकी 3528 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

यामध्ये सरपंच पदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत  माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामदेव आटोळे यांना 1732, मिलिंद शिवाजी आटोळे यांना 94, अतुल दिनकर हिवरकर यांना 1234, व सुखदेव धोंडीबा हिवरकर 452 मिळाली यामध्ये आप्पासाहेब आटोळे यांनी 498 मतांनी विजय मिळवित आपली प्रतिष्ठा कायम राखली.

प्रभाग क्रमांक एक मधील दोन जागांपैकी सर्वसाधरण महिलेच्या जागेवर प्रियतमा रामचंद्र धवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. इतर मागास प्रवर्गाच्या जागेसाठी दादाराम रामदास आटोळे 397 व ज्ञानेश्वर बबन आटोळे 261 यामध्ये दादाराम आटोळे यांनी 136 मतांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधरण महिलेच्या जागेसाठी रंजना भारत आटोळे 258 व वर्षा दिपक झगडे 347 यामध्ये वर्षा झगडे यांनी 89 मतांनी विजय मिळविला तर अनुसुचित जातीच्या जागेसाठी जालिंदर मारुती घोडे 370, धनंजय साधु घोडे 218 व शंकर लक्ष्मण सातपुते 19 यामध्ये जालिंदर घोडे 152 मतांनी विजय मिळविला. 

प्रभाग क्रमांक तीन मधिल नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रीच्या जागेसाठी लताबाई बापुराव आटोळे 371 व राणी शहाजी गावडे 489 यामध्ये राणी गावडे 118 मतांनी विजयी, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी ताराबाई राजेंद्र आटोळे 338 व  सुवर्णा संतोष आटोळे 526 यामध्ये सुवर्णा आटोळे 188 मतांनी विजयी तर सर्वसाधरण जागेसाठी राजेंद्र चंदर आटोळे 506, विठ्ठल सुरेश गाढवे 353, रायचंद बळीराम झगडे 13 यामध्ये राजेंद्र आटोळे 153 मतांनी विजयी झाले. 

प्रभाग क्रमांक चार मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला जागेसाठी अनिता दादासाहेब आटोळे 405 व छाया विठ्ठल कुंभार 275 यामध्ये अनिता आटोळे 130 मतांनी विजय मिळविला, सर्वसाधारण महिलेसाठी स्वप्निला महेश आटोळे 353, इंदूबाई शिवाजी लंगोटे 19, अश्विनी योगेश शिंदे 270, राधाबाई भारत सवाणे 47 यामध्ये स्वप्निला आटोळे या 83 मतांनी विजयी झाल्या. तर सर्वसाधारण जागेसाठी विश्वास तानाजी आटोळे 375, कांतिलाल कपूरचंद गुंदेचा 72, राजमहंमद शेख 241 यामध्ये विश्वास आटोळे 134 मतांनी विजयी झाले.

तर प्रभाग पाच मधील अनुसुचित स्त्री जागेसाठी पार्वती कुंडलिक घोडे 256 व प्रमिला दत्तात्रय शिंदे 409 यामध्ये पार्वती घोडे 153 मतांनी विजयी झाल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गातुन मच्छिंद्र सोपाना बनकर 219 , भारत किसन हिवरकर 149, रमेश बापुराव हिवरकर 307 यामध्ये रमेश हिवरकर 88 मतांनी विजयी झाले. तर सर्वसाधारण गटातुन हनुमंत बबन म्हेत्रे 472 व सनी जगदिश शिंदे 194 यांच्यामध्ये हनुमंत म्हेत्रे  278 मतांनी विजयी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com