हक्कांसाठी एकत्र या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचे आवाहन 

Appeal to all OBC leaders gathered together for rights
Appeal to all OBC leaders gathered together for rights

केडगाव : लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नसल्याने राज्यातील धनगर, ओबीसीसह मागासवर्गीय व अतिमागासवर्गीय समाज आरक्षणापासून वंचित आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष यावर काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आपल्या हक्कासाठी वंचित घटकांनाच आता एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. असा इशारा दौंड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज चौफुला ( ता.दौंड ) येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी दौलतराव ठोंबरे, महेश भागवत, पांडुरंग मेरगळ, गोरक्ष बारवकर, दादासाहेब केसकर, विठ्ठल कोकरे, बाळासाहेब तोंडेपाटील, नीलेश बनकर, गोरक्ष फुलारी, तात्यासाहेब ताम्हाणे, रामचंद्र भागवत आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. 

पांडुरंग मेरगळ म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात काढलेल्या साध्या परिपत्रकानुसार लोकसेवा आयोगापासून ते रोष्टरमधील सर्वच नोक-या व शैक्षणिक प्रवेश गेल्या चार वर्षापासून चालू आहे. परिपत्रक घटनाबाह्य असून सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेनेने ते रद्द केले नाही. या परिपत्रकामुळे एन.टी., ओबीसी नव्हे तर सर्वच मागासवर्गीयांचे आरक्षण धोक्यात आले आहे. परिपत्रकानुसार मेरीटमध्ये आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षित कोटयात धरले जात असल्याने वंचित घटकांवर अन्याय होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या चारही पक्षांची या परिपत्रकाला मुक संमती आहे.  

महेश भागवत म्हणाले, राज्यात 52 टक्के आरक्षण 72 टक्के लोकांसाठी तर 48 टक्के आरक्षण हे 28 टक्के लोकांसाठी आहे. अशी आजची परिस्थिती आहे. जोपर्यंत जातीनिहाय शिरगणती होत नाही तोपर्यंत घटनेने 'ओपन टू ऑल' हा हक्क दिला आहे. परिपत्रकानुसार हा हक्कच सध्या नाकारला जात आहे. जातीवर आरक्षण दिले जात असेल तर नॅान क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट कशाला लावली जाते. या मुद्दयाला घटनेत काहीही आधार नाही. घटनेने दिलेल्या टक्केवारीत नोकर भरती होत नाही. असे गोरक्ष बारवकर यांनी नमूद केले.   

दौलत ठोंबरे म्हणाले, आरक्षणात दुजाभाव होत असल्याने समाजात संताप आहे. राज्यातील वंचित समाजाचा सनदशीर मार्गाने व्यापक लढा उभा करणार असून याची सुरवात दौंडमधून होईल. यासाठी चौफुला ( ता.दौंड ) येथे रविवारी ( ता.24 ) मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील धनगर, माळी, सुतार, वंजारी, लोहार, वडारी, न्हावी, तेली, गोसावी, डवरी गोसावी, भराडी, ओबीसी व मागासवर्गीय जाती जमातींनी उपस्थित रहावे.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com