महिला दिनानिमित्त सकाळतर्फे ‘आर्ट टू हार्ट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.

पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे खास महिला दिनानिमित्त ‘आर्ट टू हार्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.

कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. हे आहेत. यात मेहंदी स्पर्धा, टॉक शो, ब्युटी टिप्स, संगीत रजनी आदी भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत मेहंदी स्पर्धा व ब्युटी टिप्स, दुपारी ४ ते ६ दरम्यान टॉक शो आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संगीत रजनी होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून, केवळ मेहंदी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

विनामूल्य प्रवेशाचे पासेस सकाळचे बुधवार पेठ कार्यालय आणि चंदुकाका सराफ यांच्या हडपसर, खराडी आणि रविवार पेठ शाखांमध्ये उपलब्ध आहेत. मधुरांगण आणि तनिष्का सदस्यांना ओळखपत्रावर प्रवेश मिळू शकतो. मेहंदी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मात्र सकाळच्या बुधवार पेठ कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.

सहभागींना ‘लीज ब्युटी सेंटर अँड स्पा’च्या संचालिका लीना खांडेकर ब्युटी टिप्स देणार आहेत. ‘अनमोल कला’चे अनमोल हे मेहंदी स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना पाच हजारांपासून पाचशे रुपयांपर्यंतची गोल्ड व्हाउचर देण्यात येणार असून, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच दिवशी सायंकाळी होणार आहे. संगीत रजनी कार्यक्रमात स्वप्नजा लेले, रमा कुलकर्णी, चैतन्य कुलकर्णी, दर्शना जोग, विक्रम भट, अभिजित भदे, प्रसन्न बाम हे आपली कला सादर करणार आहेत. कविता लाड-मेढेकर, इला भाटे आणि दीप्ती देवी हे कलाकार उपस्थित असतील. या कार्यक्रमाचे बॅंकिंग पार्टनर महेश नागरी मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि., ट्रॅव्हल पार्टनर एसटीए हॉल्लिडेज्‌ एलएलपी, व्हेन्यू पार्टनर अमित गायकवाड ग्रुप 
हे आहेत.

काय : आर्ट टू हार्ट
कुठे : कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर
कधी : बुधवार, ता. ८ मार्च
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत
अधिक माहितीसाठी : ९५५२११८७१०/८६०५८४६८३८

‘सकाळ’ने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना आपली कला योग्य प्रकारे सादर करण्याची संधी मिळते. त्यांना उत्तम व्यासपीठ मिळते आणि आत्मविश्‍वासही वाढतो.
- संगीता अतुल शहा,संचालक, चंदुकाका सराफ अँड सन्स, प्रा. लि.