रोटी वनक्षेत्रात अखेर कृत्रिम पाणवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पाटस - दौंड तालुक्‍यातील रोटी वनक्षेत्रात ‘सकाळ’च्या पाठपुराव्याने वन विभागाकडून नुकताच दहा हजार लिटर क्षमतेचा कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला. वरवंड येथील श्री गोपीनाथ विद्यालयातील बारावीच्या विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांकडून या पाणवठ्यात टॅंकरने आठ हजार लिटर पाणी सोडण्यात आले. वनक्षेत्रात पाणवठ्यामुळे या भागातील वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली.

पाटस-बारामती राज्यमार्गालगत रोटी येथे किमान ७० एकरांपेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. यामध्ये हरण, कोल्हा, घोरपड, लांडगा, मोर आदींसह विविध जातींचे पक्षी आहेत. मात्र, चिंकारा जातीच्या हरणांची लक्षणीय संख्या आहे. मात्र, या ठिकाणी वन्यजीवांच्या पाण्याच्या सोयीसाठी एकही पाणवठा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे बाराही महिने रोटी वनक्षेत्रातील वन्यजीवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यंदा हरणांना चक्क रोटी घाटात येऊन एका डबक्‍यातील दूषित पाण्याने आपली तहान क्षमवावी लागली. पक्ष्यांसह इतर प्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव हजारी यांना रोटी वनक्षेत्रात पाणवठा करण्याची सूचना केली. वनपरिमंडल अधिकारी अशोक पवार यांनी वनक्षेत्रात पाणवठ्याची जागा निश्‍चित केली. 

वन्य जीवांसाठी सोईस्कर बशीच्या आकाराचा कृत्रिम पाणवठा तयार केला. मंगळवारी (ता. २२) वरवंड येथील श्री गोपीनाथ विद्यालयातील विज्ञान शाखेतील माजी विद्यार्थ्यांनी नवीन पाणवठ्यात आठ हजार लिटर पाणी सोडले. सचिन दिवेकर, युवराज शिंगटे, डॉ. युवराज गोडसे, कालिदास भागवत, सचिन निंबाळकर, अमर परदेशी आदींना हा उपक्रम राबविला. रोटी वनक्षेत्रात हक्काचा पाणवठा झाल्याने वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला. अनेक दानशूरांनी पाणवठ्यात पाणी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘सकाळ’चे मानले आभार
रोटी वनक्षेत्रात पाणवठा करण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे बातमीदार अमर परदेशी यांच्या हस्ते नारळ फोडून वन अधिकाऱ्यांनी पाणवठ्यात पाणी सोडण्याचा प्रारंभ केला. वनक्षेत्रात पाण्याची सोय झाल्याने वन्यप्राणीप्रेमींनी ‘सकाळ’चे आभार मानले.

Web Title: artificial water storage roti wild area