गाडीचालकच निघाला एटीएम कार्डचा चोर

thief
thief

तळेगाव दाभाडे : ओळखीचा फायदा घेत वृद्ध निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे एटीएम चोरी झाली. त्यावरुन रोकड आणि सोने खरेदी मिळूण 3 लाख 70 हजारांची चोरी करणाऱ्या वाहनचालकास तळेगाव दाभाडे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज शनिवारी अटक केली. 
निवृत्त स्क्वार्डन लिडर अरुण देशमुख (वय ७९, रा. तपोधाम कॉलनी, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) हे माजी लष्करी अधिकारी असून चीन, बांगलादेश बरोबर झालेल्या तीन युद्धांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत सेवा बजावली आहे.

त्यांचा मुलगा सध्या लष्करात कर्नल म्हणून सेवा बजावत असून, देशमुख दांपत्य तळेगावात वास्तव्यास आहे. गेल्या २६ एप्रिलला मोबाईलवर आलेल्या अॅक्सिस बँकेच्या एसएमएसमुळे त्यांच्या एटीएम  कार्डवरुन 3 लाखांची सोने खरेदी करुन 70 हजारांची रोकड काढली गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे एटीएम कार्डचा शोध घेतला असता ते गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तसेच सदरबाब तळेगावातील सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश महाजन यांना सांगितली. याबाबत बँकेकडे विस्तृत चौकशी केली असता सोनिगरा जे ई नावाच्या दुकानातून ही खरेदी झाल्याचे समजले. त्यानंतर महाजन यांनी सदर नावाच्या जवळपास ४७ दुकानांत फोनवरुन चौकशी केली असता निगडीतील ज्वेलर्सच्या दुकानात खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. महाजन यांनी तळेगाव पोलिस ठाण्याचे हवालदार बंडू मारणे यांना सोबत घेत निगडीतील संबंधीत ज्वेलर्स दुकान गाठले. ठराविक रकमेच्या कार्ड खरेदीवेळी फोटो आयडी सक्तीचा असल्याने दुकानदादाराने पॅनकार्ड प्रत ठेऊन घेतली होती. त्यावरुन आरोपी निष्पन्न झाला. याबाबत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, तो वारंवार कुठे ये जा करण्यासाठी वापरत असलेल्या भाडोत्री गाडीचा ड्रायव्हर निघाला. नंतर पोलिसांनी सापळा रचून मुंबईला जायचे म्हणून देशमुखांकरवी फोनवरुन त्याला बोलावून घेतले. आरोपी विलास निर्मळे (३६, बोरगाव ता. माळशिरस, सोलापूर) हा गाडी घेऊन आला असता पोलिसांनी त्वरीत त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबूली दिली. खरेदी केलेल्या दागिन्यांपैकी काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील करीत आहेत. महेश महाजन यांनी तपासकामी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल पोलिस प्रशासनासह सर्वांकडून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com