सार्वजनिक आरक्षणे विकसित करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

औंध - प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडीमधील सार्वजनिक स्वरूपाची जी आरक्षणे पडून आहेत, ती सर्व प्रकारे विकसित करणार आहे; तसेच सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा व सांस्कृतिक केंद्र उभारून औंध प्रभागाला नवे रूप देण्याचे आश्‍वासन भाजपच्या उमेदवार अर्चना मुसळे यांनी पदयात्रेदरम्यान दिले. भाजपचे उमेदवार प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर यांच्यासह अर्चना मुसळे यांनी प्रभाग पिंजून काढला.  

मुसळे म्हणाल्या,‘‘ विकास आराखड्याप्रमाणे मंजूर रस्त्यांचे रुंदीकरण करणे, महादजी शिंदे रस्त्यावरील पुलाची रुंदी वाढवण्यासह वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ. ज्यामुळे औंध भागातील वाहतूक कोंडी सोडवली जाईल. त्याचप्रमाणे बाणेर ते औंधपर्यंतचा नदीपात्राचा साडेचार किलोमीटरचा मुळा नदीचा ग्रीन बेल्टचा परिसर शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित करू. त्याबरोबरच या ठिकाणची सुरक्षितता व स्वच्छता भाजपच्या माध्यमातून करणार आहोत.’’ 

नगरसेवक प्रकाश ढोरे म्हणाले, ‘‘ब्रेमन चौक ते औंध गाव ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाण पुलाकरिता प्रयत्न करणार आहोत. पीपीपी तत्त्वावर परिसरातील सर्वच मॉल व व्यावसायिक इमारतींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सार्वजनिक शौचालय निर्माण करू. तसेच परिसरात झोपडपट्टीबहुल असलेल्या परिसरात पंतप्रधान आवास योजना राबवून प्रभाग झोपडपट्टी मुक्त करू, चोवीस तास पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालयाचे आधुनिकीकरण करणार आहोत.

उमेदवार विजय शेवाळे म्हाणले, ‘‘महिला सबलीकरण व सुरक्षा यालाही प्राधान्य देणार असून, औंध बोपोडीचा विकास हेच आमचे ध्येय आहे आणि ते पूर्ण करणार आहोत. तसेच पालिकेच्या शाळांच्या आधुनिकीकरणावर भर देणार आहोत.’’

प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून भेटी देत आहोत, असे वाडेकर यांनी सांगितले. या पदयात्रेत ॲड. मधुकर मुसळे, मयूर मुंडे, परशुराम वाडेकर, सुरेश जुनवणे, रितेश बोर्डे, विजय कांबळे आदी सहभागी झाले होते. 

पुणे

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM