दिवे येथे उभारणार ऑटोमॅटिक वाहन तपासणी केंद्र

babasaheb-aajri
babasaheb-aajri

पुणे - सासवड जवळील दिवे येथे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) वाहन तपासणी केंद्र आणि वाहन परवाना ट्रॅक तयार करणे, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डेसिबल मीटरचा वापर, वाहनासंबंधीची सर्व कामे एकाच ठिकाणी होण्यासाठी ‘किऑस्क’ असे पथदर्शी प्रकल्प भविष्यकाळात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे वाहन परवाना सोडला, तर आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.

‘सकाळ’ कार्यालयास आजरी यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी ते बोलत होते. भविष्यातील आरटीओ कार्यालयाकडून हाती घेण्यात येणाऱ्या योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. देशातील जास्त वाहनांचे शहर म्हणून पुणे ओळखले जात आहे. त्यातच दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे वाहन परवाना मिळण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या व्यतिरिक्त गाडीची विक्री, कागदपत्रातील त्रुटी व आरसी बुक अशा विविध कामांसाठी नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. गर्दीमुळे त्यांचा वेळ वाया जातो. अद्यापही काही कामे पारंपरिक पद्धतीने होत असल्याने त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे लक्षात घेऊन कार्यालयातील गर्दी कमी करण्याबरोबरच नागरिकांना घरबसल्या सुविधा कशा देता येतील, यासाठी कार्यालयाकडून विविध प्रकल्पे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे अंतिम टप्प्यात आली आल्याचेही आजरी यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सासवड येथील दिवे येथे २५ एकर जागा आहे. त्या ठिकाणी नाशिकच्या धर्तीवर ऑटोमॅटिक वाहन तपासणी केंद्र आणि अत्याधुनिक वाहन परवाना स्टेटिंग ट्रॅक उभारण्याची योजना आहे, त्यामुळे दर वर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांची तपासणी अधिक पारदर्शीपणे होईल. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पुणे विभागाला दहा डेसिबल मीटर मिळणार आहेत. लवकरच ध्वनिप्रदूषण करण्याऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात येईल.’’

वेळेचा अपव्यय टाळणार
वाहन परवान्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठीदेखील नागरिकांना आरटीओ कार्यालयात यावे लागते. यात त्यांचा वेळ वाया जातो. यामुळे त्यांच्या घराजवळच ही कामे मार्गी लागावीत, यासाठी ‘किऑस्क’ सुरू करण्याची योजना प्रस्तावित आहे. सारथी ‘४.०’, रिक्षाचालकांसाठी ‘ई वॉलेट’, आरटीओ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, स्कूल बस नियमावलीचे अंमलबजावणी, अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाबासाहेब आजरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com