अवधूत गुप्तेंची ‘म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट’

अवधूत गुप्तेंची ‘म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट’

मधुरांगणचे सभासद आजच व्हा; प्रवेशिका मोफत मिळवा 
पुणे - ‘ऐका दाजीबा...’, ‘बाई बाई मनमोराचा पिसारा...’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, ‘पोरी जरा हळू हळू चाल...’, ‘ढिपाडी ढिपांग...’, ‘तुझे देख के मेरी मधुबाला...’ अशी एकाहून एक श्रवणीय आणि ठेका धरायला लावणारी मराठी गाणी फ्युजन शैलीत सादर करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची श्रवणीय मेजवानी दर्दी पुणेकर रसिकांना मिळण्यासाठी ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’ ने २० मे (शनिवार) ‘अवधूत गुप्ते म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट’ चे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक ‘जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन, पुणे परिवार’ आहेत, तर ‘सकाळ- मधुरांगण’ या कॉन्सर्टचे माध्यम प्रायोजक आहेत. 

‘ऐका दाजीबा...’पासून ते थेट शाहरुख खानच्या फॅन चित्रपटातील मराठी व्हर्जनपर्यंतचा श्रवणीय प्रवास अवधूत गुप्ते या कॉन्सर्टमध्ये सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’च्या निर्मात्या चेतना विनोद येडेल्लू यांची आहे. ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’ गेली काही वर्षे महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत आहे. 

त्वरित मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा 
अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्टची प्रवेशिका (मर्यादित प्रवेशिका उपलब्ध)

नोंदणीसाठी 

  • ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय (सकाळी ११ ते सायंकाळी ७) नाही तर सकाळ बुधवार पेठ ऑफिस किंवा सकाळ पिंपरी कार्यालय येथून फोन करून सकाळी ११ ते ७ या वेळेत घेऊन जाणे.
  • गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘मधुरांगण’ ॲप इन्स्टॉल करूनही सभासद होता येईल.
  • गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल, तर कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व व कुरिअर शुल्क ऑनलाइन भरावे.
  • नोंदणीशुल्क रु. ९९९. नोंदणी करणाऱ्यांना रु. १४९९ किमतीच्या भेटवस्तू, रु. ७००० पेक्षा अधिक किमतीची सवलत कूपने, १२ तनिष्का मासिकांचा कूपन संच, मधुरांगण ओळखपत्र
  • भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी मोठी कॅरिबॅग आणणे आवश्‍यक
  • अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

अवधूत गुप्ते म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट :

  • ठिकाण : आयएलएस लॉ कॉलेज ग्राउंड, पुणे
  • तारीख : शनिवार, २० मे 
  • वेळ : संध्याकाळी ६.३० वा.    रु. १०००, रु. ७००, रु. ५०० च्या प्रवेशिका उपलब्ध
  • प्रवेशिकांसाठी संपर्क  :- बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सकाळी ९ ते ११.३० व संध्या. ५ ते ८

ऑनलाइन तिकीट विक्रीसाठी -

www.kyazoonga.com, www.bookmyshow.com, 
www.tixdo.com, www.meraevent.com, www.buzzmyevent.com
बुकिंग : ७८७५३८०७०६, ७४४७७५३१८२, ७४४७७५३१८३ किंवा ८८५५०९९१४८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com