अवसरीच्या विद्यार्थ्यांचे चेन्नईतील स्पर्धेत यश

avasari students win in Chennai
avasari students win in Chennai

राष्ट्रीय ट्रॅक्‍टर डिझाईन स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने पटकावला तिसरा क्रमांक

मंचर (पुणे) : चेन्नई येथे श्री रामास्वामी मेमोरिअल विद्यापीठाच्या आवारात सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया (एस.ए.ई.) दक्षिण विभागामार्फत देशपातळीवरील ट्रॅक्‍टर डिझाईन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकाविला. साठ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या कर्षयण टीममधील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

चेन्नई येथे 21 जून ते 23 जून या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत देशातील तीस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघानी भाग घेतला होता. त्यापैकी 18 संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत ड्यूरॅबिलिटी टेस्ट, ब्रेक टेस्ट, म्यॉन्युवरॅबिलिटी टेस्ट आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये टीम कर्षयणने अव्वल कामगिरी दाखविली. तसेच, विद्यार्थ्यांनी या ट्रॅक्‍टरमध्ये लोड सेल, न्यूट्रल स्वीच यांसारख्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ट्रॅक्‍टरला बनवण्याकरिता तीन लाख वीस हजार खर्च आला आहे.

संघ प्रमुख अमोल दुनबळे, स्वप्नील पवार, आनंद मसणकर, प्रांजल पाटील, मनीष बारस्कर, गणेश पारस्कर, सागर जाधव, कैलाश चव्हाण, पंकज माढेकर, संकेत गायकवाड, भावेश इंगळे, सुजित इंगळे, अनुप तिवारी, मयूर राऊत, मुकुल केदार, रुचिता कुंभारे, सुरभी खपले, किरण थोरात, कैफइक्‍बल शेख, पूजा शिंदे, सचिन तिवारी, स्नेहल बाबर, निवेदिता मेनन, कौस्तुभ संकपाळ, व अनुजा साकोरे यांनी स्वयंचल व यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने ट्रॅक्‍टर तयार केला.

प्रा. रवी काकडे (शिक्षक सल्लागार), स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप पानगव्हाणे, यंत्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. श्रीधर जोशी यांचे संघाला मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

710 किलोची ट्रॅक्‍टर
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅक्‍टरचे वजन 710 किलो आहे. ट्रॅक्‍टरची वजन वाहून नेण्याची क्षमता दोन टन आहे. ट्रॅक्‍टरची लांबी दोन हजार 450 मि.मी. व रुंदी एक हजार 210 मि.मी. आहे. कमाल वेग ताशी 25 किलोमीटर आहे. ट्रॅक्‍टर तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com