दूरदृष्टीने भाजपत प्रवेश - पानसरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पिंपरी - ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला प्रत्येक वेळी गृहीत धरले. केवळ अल्पसंख्याक म्हणून डावलले. निवडणूक आली की, आपल्याला विचारले जायचे. एरवी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. माझे कार्यकर्ते अन्याय किती सहन करणार? म्हणून दूरदृष्टीने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. कोणत्याही आश्‍वासनाशिवाय आपण भाजपमध्ये दाखल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील एक ज्येष्ठ व लोकप्रिय बहुजन नेता म्हणून पानसरे यांची ओळख आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते ‘सकाळ’शी बोलत होते. पक्ष बदलण्याचा विचार घोळत होता. पण आता घेतलेला निर्णय हा ‘दिल आणि दिमाखसे’ घेतला आहे. असे सांगून ते म्हणाले, ‘‘इतकी वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निष्ठेने काम केले. आज नाही तर उद्या संधी मिळेल, यासाठी शांत राहिलो; पण माझ्या कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती. त्यांना मी काय उत्तर देणार. ते अन्याय किती दिवस सहन करणार. माझे म्हणणे नेहमीच डावलण्यात आले. मी शांत होतो; पण कार्यकर्ते अस्वस्थ होते. शेवटी सहनशीलतेला मर्यादा असतात. मागे जे आश्‍वासन दिले, त्यापासूनही ते नेते दूर गेले. माझ्याबरोबर कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. शेवटी योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे होते. दूरदृष्टीने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मला माझ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे.’’

भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि माझे आजही पूर्वीप्रमाणेच सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाकडून विचारणा झाल्यावर विचार न करता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार महेश लांडगे व जगताप यांच्याबरोबर आपण एकदिलाने पक्षाचे काम करणार आहोत, असेही पानसरे यांनी सांगितले.

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM