बाबासाहेबांचे कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तिसाठी प्रेरणादायी - हर्षवर्धन पाटील 

ganesh dhandoare mitramandal news
ganesh dhandoare mitramandal news

इंदापूर (वालचंदनगर) - डॉ. बाबासाहेबांचे कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तिसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे आज प्रत्येक व्यक्तिला स्वातंत्र्य, न्याय मिळत आहे. वालचंदनगर युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त गरजू महिलांना साडी वाटपाचा आयोजित केलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून इतर सार्वजनिक उत्सव मंडळांनी महापुरुषांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. असे उद्गार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले आहेत.

वालचंदनगर येथील युवकांनी मिरवणूकीतील डीजेच्या खर्चाला फाटा देवून समाजातील गरजू महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवक कार्यकर्ते गणेश दिलीप धांडोरे मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. युवकांनी यावर्षी मिरवणूकीतील डीजेच्या खर्चाला फाटा दिला व यातून बचत झालेल्या पैशातून गरजू महिलांना साड्या वाटपाच्या कार्य्रकमाचे आयोजन केले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महिलांना साड्या वाटप करण्यात आले. 

वालचंदनगरच्या सरपंच छाया मोरे, उपसरपंच संदीप पांढरे, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, बाळासाहेब डोंबाळे, माजी सभापती प्रदीप पाटील, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, माजी संचालक ज्ञानेदव बोंद्रे, कर्मयोगीचे संचालक राजेंद्र गायकवाड, दयानंद झेंडे यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन गणेश धांडोरे, लक्ष्मण चांदणे, अनिल बनसोडे, संतोष क्षीरसागर, बारीक यादव, महेश बोंद्रे यांनी केले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com