"बालगंधर्व'मधील कॅंटीन तीन महिन्यांपासून बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - पुण्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कॅंटीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कडाक्‍याच्या थंडीतही रसिकांना वाफाळत्या चहापासून वंचित राहावे लागत आहे. कलाकारांनाही नाटकानंतर जेवणाची सोय कोठे करायची, याची विवंचना पडत आहे. 

पुण्यात नाट्यगृहाची संख्या वाढली असली तरी कलावंतांकडून प्रथम मागणी बालगंधर्व रंगमंदिराचीच होते. त्यामुळे येथे सतत वेगवेगळे नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. हा परिसर गर्दीने फुललेला असतो. 

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून येथील अधिकृत कॅंटीन बंद असल्याने रसिकांबरोबरच कलाकारांचेही हाल होत आहेत. कॅंटीन तातडीने सुरू व्हावे, अशी मागणी करूनही महापालिकेने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही. 

यासंदर्भात "बालगंधर्व'चे व्यवस्थापक भारत कुमावत म्हणाले, ""कॅंटीन फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार होती; पण अचानक बंद झाल्याने हा प्रश्‍न उद्‌भवला आहे. नवे टेंडर काढले जात आहे; पण आचारसंहिता लवकरच लागू होईल. अशा स्थितीत फेब्रुवारीनंतर कॅंटीन सुरू होण्याची शक्‍यता आहे.'' 

टॅग्स

पुणे

पुणे - शहरात उद्रेक झालेला डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आता घरोघरी जाऊन डासांचा नायनाट करण्यात येणार आहे. या मोहिमेची...

06.03 AM

पुणे - महापालिका निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात फारसे लक्ष...

05.12 AM

पुणे - मध्यरात्री अचानक तनया उठली आणि रडायला लागली. काय झालं, असं मी तिला विचारलं. ती म्हणाली, ‘‘माझी ‘ती’ आई आहे ना! ती...

05.03 AM