व्यंगचित्रकार बापू घावरे यांचे निधन

Bapu_Ghaware_
Bapu_Ghaware_

पुणे : आपल्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यांत आसू आणणारे प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे (वय 70) यांचे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.


'मोहिनी' या दिवाळी अंकात त्यांचे सन 1989 मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'प्रभात'मध्ये सुमारे 14 वर्षे त्यांची चित्रं नियमित प्रसिद्ध झाली. 'सकाळ'च्या 'गुदगुल्या' पुरवणीत त्यांची व्यंग्यचित्रे प्रसिद्ध होत असत. विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक चित्रे काढली. त्याची 20 प्रदर्शने पुणे शहरात आणि 5 ग्रामीण भागात झाली आहेत. यातील ठराविक व्यंग्यचित्रांची "लाफिगं क्‍लब' आणि 'हास्यवाटिका' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे "बहुरूपी' आणि "शिमग्याची सोंगं' हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.


ते मूळचे मुळशी तालुक्‍यातील बेलावडे गावचे होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com