दूधाचे मोफत वाटप करुन बारामतीत आंदोलन

milk-agitation
milk-agitation

बारामती - दूधाला दरवाढ मिळावी यासाठी आज बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकांना दूध मोफत प्यायला देऊन आंदोलन केले गेले. प्रशासकीय इमारतीसमोर आज सरकारी कर्मचा-यांना देखील राष्ट्रवादीने दूधाचे ग्लास देत दूध दर वाढीसाठी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्ष अनिता गायकवाड, वनिता बनकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, खरेदी विक्री संघाचे अँड राजेंद्र काटे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शासनाचा अभिनव पध्दतीने निषेध करण्यासाठी बारामती नगरपालिका, पंचायत समिती तसेच राज्य परिवहन मंडळाच्या चालक वाहकांना आज दूध मोफत देत गांधीगिरीने निषेध नोंदविण्यात आला. 

प्रशासकीय भवन येथेही सरकारी कर्मचा-यांना दूध देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी भवन पासून प्रशासकीय इमारत व तेथून बसस्थानक, पंचायत समिती व नगरपालिकेत येत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांनी जोरदार आंदोलन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com