बारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त

बारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त

बारामती शहर : येथील गुन्हे शोध पथकाने संशयावरुन हटकलेल्या युवकाकडून तब्बल चार गावठी बनावटीची पिस्तुले व दहा जिवंत काडतूसे सापडली. चार पिस्तुले एकाच युवकाकडे सापडल्याने पोलिस दलही हादरले असून आता आणखी काही हत्यारे दडविण्यात आली आहेत का याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

दत्ता अशोक शिंदे (रा. राहू पिंपळगाव, ता. दौंड) असे या संदर्भात अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील पाटस रस्त्यावरील गायकवाड हॉटेलनजिक एक युवक गावठी पिस्तुले घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी संदीप जाधव, स्वप्नील अहिवळे, सुहास देवकाते, दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, रमेश केकाण यांनी संशयित युवकास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्या वेळेस त्याने कमरेला पिस्तूल लावले होते तर खिशात दहा जिवंत काडतूसे होती. त्याच्या गाडीला लावलेल्या बॅगची झडती घेतल्यानंतर आणखी तीन गावठी पिस्तूले आढळून आली.

या सर्व पिस्तूलांची किंमत दोन लाख रुपयांहून अधिक असून पोलिसांनी दत्ता शिंदे याची दुचाकी गाडी, मोबाईलही जप्त केला आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी या बाबत आता या युवकाकडे अधिक तपास सुरु केला असून ही पिस्तुले कोणाला द्यायला आणली होती की त्याचा काही इतर उद्देश होता या दृष्टीने त्यांचा तपास सुरु झाला आहे. 

ऐन गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीच्या आदल्या दिवशी चार पिस्तूल सापडल्याने या मागे आणखी काही उद्देश तर नव्हता ना याचाही पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com