राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बारामती - लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली. 

बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दुष्काळाबाबत निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. इतक्‍या दिवस टंचाईमुळे शेतकरी आत्महत्या करत होते. आज शेतकऱ्यांची मुलेदेखील आत्महत्या करायला लागली आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, राज्य सरकार आता नेमकी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला. 

 मराठा, धनगर, मुस्लिम किंवा लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकताच नाही. संघ परिवाराच्या विचारधारेवर केंद्र व राज्यातील सरकार चालत असल्याने आरक्षण देण्यापेक्षा हे घोंगडे असेच भिजत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.