स्त्रियांनी आत्मनिर्भर होण्याची गरज - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

बारामती - ‘‘महिलांवर कोणतीही जबाबदारी टाकल्यास त्या समर्थपणे ती पार पाडतात. बदलत्या काळात स्त्रियांनी आत्मनिर्भर होत आत्मविश्‍वास वाढवायला हवा,’’ अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 

सकाळ तनिष्का नेतृत्व विकास कार्यक्रमअंतर्गत महिलांसाठी एलईडी माळा तयार करण्याच्या प्रशिक्षण मेळाव्याचे उद्‌घाटन गुरुवारी पवार यांच्या हस्ते झाले. पुण्यातील प्रशिक्षक दीप शहा यांनी महिलांना माळा बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या वेळी बाजारपेठ, कच्चा माल, मार्केटिंग याबाबत माहिती दिली गेली. सातशेहून अधिक महिला यात सहभागी झाल्या होत्या.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, तनिष्काचे समन्वयक डी. आर. कुलकर्णी, गटनेते सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तनिष्का व्यासपीठाच्या प्रमुख ज्योती लडकत, सुनील लडकत यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होत्या. अजित पवार म्हणाले, ‘‘आज एलईडी माळा बनविण्याच्या माध्यमातून तनिष्का व्यासपीठाने महिलांना घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीच्या महिलांनी याचा लाभ घ्यावा.’’ बारामतीतील गणेश मार्केटच्या वरच्या मजल्यावरची जागा महिलांच्या बचत गट किंवा स्वयंरोजगाराची उत्पादने विकण्यासाठी देण्याचा विचार बोलून दाखवतानाच ज्योती लडकत यांच्या सामाजिक बांधिलकीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. लडकत यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा तसेच तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा प्रास्ताविकातून सविस्तर आढावा घेतला. रमेश डोईफोडे यांनी सकाळ व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बारामती तालुक्‍यात सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने पन्नास गावांतून एक कोटी रुपये ओढा खोलीकरणासाठी दिल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. याप्रसंगी पौर्णिमा तावरे, ज्योती पवार, तनुजा शहा यांची भाषणे झाली. ज्ञानेश्‍वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर नेहा शहा यांनी आभार मानले. या वेळी नीला गाडे, संगीता ढवाण पाटील, वनिता बनकर, मीनाक्षी तावरे, कमल हिंगणे, रोहिणी तावरे, संध्या बोबडे, संगीता पाटोळे आदी उपस्थित होत्या.       
‘बाजारपेठ मिळवून देऊ’
तनिष्काच्या माध्यमातून दीड लाखावर महिलांचे राज्यव्यापी व्यासपीठ उभारल्याबद्दल त्यांनी सकाळ परिवाराचे अभिनंदन करत ही मोठी कामगिरी असल्याचे नमूद केले. महिलांनी तनिष्कासारख्या माध्यमातून जर दर्जेदार माल तयार केला, तर त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

Web Title: baramati pune news Women need to be self-sufficient