बारामतीतील व्यापा-यांची शरद पवार यांच्याशी चर्चा

बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील जागेच्या प्रश्नाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज व्यापा-यांनी बारामतीत भेट घेतली.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Summary

बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील जागेच्या प्रश्नाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज व्यापा-यांनी बारामतीत भेट घेतली.

बारामती - शहरातील सिनेमा रस्त्यावरील जागेच्या प्रश्नाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आज व्यापा-यांनी (Traders) बारामतीत (Baramati) भेट घेतली. माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अँड. संदीप गुजर, आदेश वडूजकर, शैलेश साळुंके, चंद्रकांत शिंगाडे, मनोज मुथा, किरण इंगळे, विजय जोशी, नितीश शहा, सुरेंद्र मुथा, फणिंद्र गुजर, सुनील शिंदे, फखरुद्दीन बारामतीवाला, सतीश तावरे आदींचा समावेश होता.

या प्रसंगी व्यापा-यांनी आपली भूमिका शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनीही तातडीने संबंधितांना या बाबत योग्य सूचना दिल्या. या संदर्भात पवार यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही व्यापा-यांच्या शिष्टमंडळास दिली असल्याचे जवाहर वाघोलीकर यांनी सांगितले.

पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बारामती नगरपालिकेने 1922 मध्ये 99 वर्षांच्या कराराने सिनेमा रस्त्यावरील काही जागा भाडेतत्त्वावर देऊ केल्या होत्या. त्या वेळेस झालेल्या लिलावामध्ये चांगली किंमत आल्याने 99 वर्षाच्या कराराच्या मुदतीनंतर पुन्हा पुढे 99 वर्षांसाठी जागा हक्क ठेवणा-या व्यक्ती व व्यापा-यांना देण्यात याव्यात असा ठराव झाला होता. दरम्यान सरकारनेही 2021 मध्ये कोणताही सत्ताप्रकार असलेल्या जागा भोगवटादारांना रुपांतरीत करुन मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar
सकाळ एक्सलेन्स अँवार्डचे पुण्यात वितरण

बारामती नगरपालिकेने मात्र ही जागा नगरपालिकेच्या मालकीची व्हावी असा ठराव केला होता. ही जागा नगरपालिकेच्या मालकीची झाली तर पाचशेहून अधिक कुटुंबाना याची झळ बसेल, अशी भीती व्यापा-यांनी बोलून दाखविली.

या ठरावाविरोधात व्यापा-यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने या प्रक्रीयेलाच स्थगिती दिली आहे. सांगलीमध्ये सत्ताप्रकार रद्द करुन व्यापा-यांना जागा मालकी हक्काने देण्याचा निर्णय झाल्याची बाब व्यापा-यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

गुरुवारी जिल्हाधिका-यांसमवेत बैठक...

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत या व्यापा-यांची गुरुवारी (ता. 3) महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक मार्ग निघेल अशी व्यापा-यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com