बारामतीचा सर्वांगिण विकास हेच उद्दिष्ठ : अजित पवार

Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar
Baramatis total development is the main objective for NCP says Ajit Pawar

बारामती शहर - समाजातील सर्वच घटकांना सोबत घेत बारामतीचा सर्वांगिण विकास साध्य करण्याचे उद्दीष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नजरेसमोर ठेवले असून या शहराचा परिपूर्ण विकास आगामी काळात वेगाने करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. 

बारामती नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आज 22 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार व सोळा महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजारांच्या अनुदानाचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पवार बोलत होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविकात महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा चौधर यांनी आढावा घेतला. 

याप्रसंगी रुई भागातील पाण्याचा तसेच रस्त्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आपण लक्ष घालू असे आश्वासन पवार यांनी दिले. बारामतीचा विकास होत असताना सर्वच भागाचा विकास व्हायला हवा अशी आपली भावना असून त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. पाण्याच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि रस्त्याच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे ते म्हणाले. सर्वच नगरसेवकांसह प्रशासानानेही एकदिलाने काम करुन विकासकामे मार्गी लावावीत असे आवाहन पवार यांनी केले. उपसभापती सीमा चिंचकर यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com