"बार्टी'त प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) न्यायिक सेवा पूर्वप्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. त्यातील अनुसूचित जातीतील 13 विद्यार्थी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले. या विद्यार्थ्यांमधील औरंगाबादच्या रितेश निकम याने परीक्षेत 52वा क्रमांक पटकावला आहे. "बार्टी'च्या स्पर्धा व व्यावसायिक स्पर्धा विभागामार्फत अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना "बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा' यांच्याकडून या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. याअंतर्गत न्यायिक सेवा परीक्षा 2016च्या पूर्वतयारीसाठी राज्यभरातील अनुसूचित जाती व जमातीच्या 155 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील अनुसूचित जातीच्या 135 विद्यार्थ्यांनी आणि अनुसूचित जमातीच्या 20 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्यातील 13 विद्यार्थी परीक्षेत यश मिळवून मुलाखतीस पात्र ठरले आहेत. 

संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे, निबंधक रूपाली आवले आणि प्रकल्प संचालिका प्रणाली दहिवाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. "बार्टी'मार्फत न्यायिक सेवापूर्व प्रशिक्षण 2017 वर्गही सुरू करण्यात येणार असून, त्याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दहिवाळ यांनी केले आहे. 

Web Title: Barti students succeed in the competition