बीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवीधारक अशी अट आहे. परंतु वाणिज्य शाखेशी संलग्न बॅचरल इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवीधारकांनाही या पदासाठी अर्ज करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बीबीए झालेल्या काही विद्यार्थ्यांनी केली आहे.

विविध पदांसाठी बी. कॉम.बरोबरच बीबीए ही पदवी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे बीबीए पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित पदासाठी अर्ज करता येतो.

त्याचप्रमाणे नगर परिषदेतील पदांसाठी बीबीए अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वरळी येथील नगर परिषद प्रशासन संचालनालयाला याबाबत विचारण्यात आले. त्या वेळी लिपिक भगवान बंगे म्हणाले, ‘‘जानेवारी २०१८मध्ये मंजूर झालेल्या सेवा नियमानुसार नगर परिषद किंवा नगरपंचायतीमधील लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी केवळ वाणिज्य शाखेतील पदवीधरांनाच अर्ज करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये बीबीएचा उल्लेख नाही.

सेवानियमानुसार आम्हाला या पदासाठी बीबीए झालेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविता येत नाही.’’ याविषयी अधिक माहितीसाठी उपसंचालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नगर परिषदेच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा आम्ही प्रयत्न केला; परंतु तो स्वीकारला जात नाहीये. म्हणून आम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधला. या पदासाठी बी.कॉम.समवेत बीबीए झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे.
- सुमीत बेले, बीबीए पदवीधारक विद्यार्थी

Web Title: BBA student Accountant