Best Cooperative Sugar Factory Award to Bhimashankar Factory Pargaon Pune
Best Cooperative Sugar Factory Award to Bhimashankar Factory Pargaon Pune

भीमाशंकर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार 

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास साखर कारखानदारी क्षेत्रात तांत्रिक बाबींचा अभ्यास करणाऱ्या भारतीय शुगर संस्थेचा भारतीय शुगर अॅवार्ड 2018 मधील देशातील साखर उद्योगातील बहुमोल योगदानाबद्दल 'बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटीव्ह शुगर मील अॅवार्ड' सर्वोत्कुष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहीती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

नुकत्याच कोल्हापुर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात शुगर अॅवार्ड 2018 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले वेधगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, डी. एम. शिंदे, ज्ञानेश्वर गावडे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान बोर्हाडे, तानाजी जंबुकर, ज्ञानेश्वर आस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकीनी हांडे, रमेश लबडे, उत्तम थोरात, सचिव रामनाथ हिंगे व राजेश वाकचौरे यांनी स्विकारला.
या प्रसंगी भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, जेष्ठ संचालक चंद्रराव तावरे, कुष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, शुगर विभागाचे संचालक चंद्रमोहन व साखर कारखानदारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रतिक्रीया देताना प्रदिप वळसे पाटील म्हणाले, भीमाशंकर कारखान्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी,  आधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रीत उत्कृष्ठ काम केल्याने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

भीमाशंकर कारखान्याने आर्थिक वर्षात केलेली कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणुक, वेळेत अदा केलेले ऊसदर, ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्तमुल्य , शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा , कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनीयोगासाठी केलेले नियोजन या सर्व बाबींचा विचार करुन कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com