खेळणे हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय

खेळणे हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय

ताणतणाव... आजकालच्या धकाधकीच्या जीवनात विशेषतः नोकरीला लागलेल्या युवकांमध्ये परवलीचा शब्द झाला आहे; पण याला तेच जबाबदार आहेत असे वाटते. कारण, हा वर्ग फक्त नोकरी आणि करिअर यामागे लागलेला दिसून येतो. नोकरीच्या वेळादेखील आडनिड असतात. त्यामुळे ना धड विश्रांती ना झोप. अशा स्थितीत झोपेच्या वेळी काम आणि दिवसा झोप असे काहीसे विचित्र राहणीमान होऊन बसले आहे. येथेच ते ताणतणावाचे शिकार बनतात. यांना मोकळी हवा, मोकळा श्‍वास मिळतच नाहीत.

खेळापासून दूर राहून ते जगत आहेत. वाचाल तर...वाचाल त्याचप्रमाणे खेळाल तर...जगाल असे मला वाटते. माझ्या अनुभवावरून बोलत आहे. कारकिर्दीत कबड्डी खेळाची निवड केली आणि तो खेळत राहिलो याचा मला फायदा ताणतणावापासून दूर राहण्यासाठी झाला.

कबड्डी खेळायला लागलो, तेव्हा घरचा पाठिंबा होता; पण घरची परिस्थिती तशी बेताची. वडिलांची तब्येतही नाजूक असायची. त्यामुळे सकाळी दूध आणि पेपरची लाईन टाकायची नंतर पडेल ते काम, संध्याकाळी प्रॅक्‍टिस रात्री पुन्हा वॉचमनची नोकरी असा दिनक्रम होता. थकवा जाणवायचा. मनात एकवेळ विचार यायचा चल सगळे सोडून देऊ आणि फक्त नोकरी एके नोकरी करू. याचा विचार मैदानात सरावाला उतरलो की सगळा पुसून जायचा. कमालीचे मोकळे झाल्याचे वाटायचे. त्यामुळेच तेव्हापासून ताणतणावापासून दूर राहण्यासाठी माझ्यासाठी फक्त खेळ खेळणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

शालेय गटाची १९ वर्षाखालील स्पर्धा खेळण्यासाठी नगरला गेलो होतो. पहिला विजय मिळाल्यावर पुण्यात शेजारी फोन केला, तेव्हा आईला रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे हॉस्पिटलला नेल्याचे कळले. अंगातले त्राण गेले होते. खेळू शकेन की नाही माहीत नव्हते; पण सरांनी आणि सहकाऱ्यांनी धीर दिला. मैदानात उभा राहिलो. काय झाले ते कळले नाही; पण जोमाने खेळलो. समोर फक्त प्रतिस्पर्धी संघातील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com