'रिबविप'चे पुणे विद्यापिठात भिकमांगो आंदोलन

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

भारतीय बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंसमोर भिक मांगो आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्या करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने भारिविप तर्फे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक भिक आणि खेळण्यातील अॅम्ब्यूलन्स देऊन या प्रकाराचा निषेध करण्यात आला. कुलगुरूंनीही या सर्व मागण्यांचा विचार करून त्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले. 

पुणे : भारतीय बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंसमोर भिक मांगो आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्या करूनही त्याकडे लक्ष न दिल्याने भारिविप तर्फे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक भिक आणि खेळण्यातील अॅम्ब्यूलन्स देऊन या प्रकाराचा निषेध करण्यात आला. कुलगुरूंनीही या सर्व मागण्यांचा विचार करून त्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले. 

या महिनाअखेरीपर्यंत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. तसेच नव्या अभ्यासक्रमाच्या मुलांना नव्याने संधी दिली जाईल आणि बोगस महाविद्यालयासंबंधी कारवाईचे आश्वासन कुलगुरूंनी दिले. शिवाय रिचेकिंग प्रकरणी पैसे घेऊन पास केले जात असल्याची सीआयडी चौकशी व्हावी, अन्यथा कुलगुरूंची गाडी अडवू अशी ताकीद अॅड. मंदार जोशी यांनी यावेळी दिली. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना भेटणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली. या आंदोलनाचे नेर्तृत्व राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सरचिटणीस सूरज गायकवाड, विद्यार्थी युवती प्रदेशाध्यक्ष चित्राताई जानुगडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष वैभव पवार यांनी केले. 

Web Title: bhikmango protest by BBVP pune esakal news