भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन” पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
‘उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन’पुरस्कार स्वीकारताना भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ.
‘उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन’पुरस्कार स्वीकारताना भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक मंडळ.Sakal

पारगाव - दत्तात्रयनगर (पारगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा गाळप हंगाम २०१९-२० करीता जाहीर झालेला मध्य विभागातील ‘उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन’ पुरस्काराचे वितरण आज रविवारी राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आज रविवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बुद्रुक येथे राज्यस्तरीय साखर परिषदमध्ये राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सन २०१९-२० व सन २०२०-२१ गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना, उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन, उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखान्यांचे अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी गृहमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, संजय खताळ, शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्काराचा स्वीकार कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, भगवान बो-हाडे, तानाजी जंबुकर, ज्ञानेश्वर अस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे यांनी केला.

यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. बेंडे म्हणाले ऊस बेणे बदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागणीवर भर, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करुन नियंत्रणावर विशेष भर, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठ्यावर भर, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षणावर विशेष भर, कृषी निविष्ठांचा मोठया प्रमाणावर पुरवठा, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील तीन वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करून उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार देण्यात आला.

गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व त्यानुसार संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितरित्या काम केल्याने कारखान्यास उत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला असून कारखान्यास आजपर्यंत देश पातळीवरील ११ व राज्य पातळीवरील ११ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झालेले आहे असे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com