'भीमथडी'चे पुण्यात २२ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

यावर्षी भीमथडी ही ऑनलाईन करण्याचा निर्धार असल्याने देशातील सर्व स्तरातून नावीन्यपूर्ण उत्पादने असणाऱ्या बचत गटांना संधी देण्याचे ठरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला बचत गटाची ज्योत वेगाने वाढविण्याचा मानस आहे

कोल्हापूर - अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' व शारदा महिला संघामार्फत आयोजित भीमथडी जत्रेला यंदा १२ वर्षे पूर्ण होत असून लाखोंची उपस्थिती लक्षात घेता येणाऱ्या भीमथडीमध्ये हायटेक पद्धती अवलंबण्यात येणार आहेत. भीमथडी जत्रा ही देशातील व राज्यातील आधुनिक बाजारपेठेचे एक उत्तम आदर्श ठरणार आहे. यामध्ये देशातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नाविन्यपूर्ण बचत गटांच्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन व विक्री २२ ते २५ डिसेंबर २०१७ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी दिली. 

गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक बचत गट आपले स्टॉल उभारण्यासाठी मागणी करत असतात. मात्र यावर्षी भीमथडी ही ऑनलाईन करण्याचा निर्धार असल्याने देशातील सर्व स्तरातून नावीन्यपूर्ण उत्पादने असणाऱ्या बचत गटांना संधी देण्याचे ठरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला बचत गटाची ज्योत वेगाने वाढविण्याचा मानस आहे. 

त्यामुळे या वर्षीच्या भीमथडीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या गटाचे अथवा संस्थेचे नाव, उत्पादनांचे नाव तसेच उत्पादनांचे फोटो व इतर महत्त्वपूर्ण माहितीसह भीमथडीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी,जेणेकरून ह्यामुळे प्रवेश निश्चिती करण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर बचत गटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात संधी मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, 

नोंदणी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. -ऑनलाईन नोंदणी - २५ मे ते २५ जुलै २०१७ ,उपलब्ध अर्जांची छाननी - २६ जुलै ते १० ऑगस्ट २०१७,पात्र बचत गटांच्या अंतिम मुलाखती - १५ ते २० ऑगस्ट २०१७ अधिक माहितीसाठी  सर्च करा www.bhimthadijatra.com  अथवा मेल करा enquiry@bhimthadijatra.com 

Web Title: Bhimthadi Jatra to commence from 22 December