भीमथडी जत्रेला पुणेकरांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - राज्यातील सर्व कलाकार, आदिवासी आणि महिला बचत गटांच्या कलागुणांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या "भीमथडी जत्रे'ला दुसऱ्या दिवशीही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

पुणे - राज्यातील सर्व कलाकार, आदिवासी आणि महिला बचत गटांच्या कलागुणांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या "भीमथडी जत्रे'ला दुसऱ्या दिवशीही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सलग दहा वर्षे यशस्वीरीत्या आयोजनानंतर 11व्या "भीमथडी जत्रे'चे उद्‌घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले. ही जत्रा 5 मार्चपर्यंत सुरू राहणार असून, यात महिला बचत गटांच्या वस्तू, खाद्यान्न आणि धान्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. 8 राज्यांतून आलेल्या कलाकारांच्या हस्तकला, सेंद्रिय खतांवरील धान्ये, फळभाज्या, मसाले यांची विक्री येथे केली जात आहे.

'राज्यातील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी खाद्य महोत्सवही आयोजित केला आहे. संगीतप्रेमींसाठी "कबीर कॅफे' हा बॅण्ड, "माटीबानी' आणि "जागर लोककलेचा' या कार्यक्रमांची मेजवानी घेता येईल,'' अशी माहिती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त आणि भीमथडी जत्रेच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी दिली. आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आदिवासींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, हातमाग, वन औषधी, शिल्पे आणि चित्रशैलींचे प्रदर्शन आणि विक्रीही केली जात आहे.

पुणे

पुणे - गणेशोत्सवात बेकायदा मांडव, कमानी त्यासाठी बेकायदा खड्डे खोदलेल्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी...

02.12 AM

पुणे -शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यानंतरही त्यातील अडचणी काही केल्या दूर होण्यास तयार नाहीत. आता परिवहन विभाग आणि राज्य परिवहन...

02.12 AM

पुणे -पुणे पोलिसांच्या विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. आयोगाच्या पत्रव्यवहारांबाबत...

02.09 AM