भोरच्या ‘संग्रामात’ थोपटे विजयी

निर्मला आवारे
निर्मला आवारे

भोर - नगरपालिकेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षांसह १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. चौरंगी लढतीत राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. काही उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली. काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा जिंकून भोरमधील विजयाची परंपरा कायम ठेवली. नगरपालिकेत आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व कायम राहिले.

सोमवारी (ता. १६) सकाळी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मतमोजणी तीन तासांत पार पडली. काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांनी नगरपालिकेच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. निकालानंतर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात गुलालाची उधळण करीत फटाक्‍यांच्या आवाजात आनंद साजरा केला. 

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निर्मला रामचंद्र आवारे या ३ हजार ९६८ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या शारदा डाळ यांचा पराभव केला. निर्मला आवारे यांनी ६ हजार ९६४ मते मिळाली. शारदा डाळ यांना २ हजार ९९६ मते मिळाली. भाजपच्या दीपाली शेटे यांना १ हजार २५६, तर शिवसेनेच्या स्वप्ना देशपांडे यांना ७३४ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३(ब) मधील काँग्रेसच्या तृप्ती जगदीश किरवे या सर्वाधिक ७९३ मतांनी विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक ८(ब) मधील आशा शिंदे या सर्वांत कमी ९९ मतांनी विजयी झाल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकीचा आणि भोरमधील जनतेचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

काँग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - नगराध्यक्षा - निर्मला रामचंद्र आवारे, नगरसेवक - पद्मिनी तानाजी तारू, चंद्रकांत आनंता मळेकर, समीर उत्तम सागळे, आशा विश्वनाथ रोमण, सचिन अशोक हर्णसकर, तृप्ती जगदीश किरवे, रूपाली रवींद्रनाथ कांबळे, अमित ज्ञानोबा सागळे, अमृता प्रशांत बहिरट, गणेश ज्ञानोबा पवार, वृषाली अंकुश घोरपडे, देविदास अरविंद गायकवाड, सोनम गणेश मोहिते, अनिल नारायण पवार, स्नेहा शांताराम पवार, आशा बजरंग शिंदे, सुमंत सुभाष शेटे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com