"राष्ट्रवादी'च्या गोटात भाजपचा शिरकाव 

(संजय बेंडे) 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

भोसरी गावठाण क्रमांक 7 

भोसरी - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी गावठाण प्रभागात आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशामुळे तेथे आता भाजपलाही बळ मिळाले आहे. शिवसेनेला मानणाराही वर्ग येथे असला, तरी ही लढत "राष्ट्रवादी' आणि भाजप अशीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. 

भोसरी गावठाण क्रमांक 7 

भोसरी - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी गावठाण प्रभागात आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशामुळे तेथे आता भाजपलाही बळ मिळाले आहे. शिवसेनेला मानणाराही वर्ग येथे असला, तरी ही लढत "राष्ट्रवादी' आणि भाजप अशीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत. 

सॅंडविक कॉलनी, भोसरी गावठाण आणि शीतलबाग अशा तीन वार्डांचा भाग मिळून भोसरी गावठाण प्रभाग तयार झाला आहे. शीतलबागेचे प्रतिनिधित्व लांडगे यांनी केले होते. या प्रभागात सर्वसाधारण प्रभागात (ड) राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवक जालिंदर शिंदे, तर भाजपनेही विद्यमान नगरसेवक ऍड. नितीन लांडगे यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे नगरसेवक लांडगे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये, तर नगरसेवक शिंदे हे कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. त्यामुळे मूळचा पक्ष सोडून नव्या पक्षाद्वारे निवडणुकीत उतरलेले नगरसेवक आमने-सामने आहेत, तर गेल्या निवडणुकीत आमदार लांडगे यांच्याविरोधात नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविलेले दत्ता गव्हाणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटात होणारी ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. नगरसेवक शिंदे यांचा प्रभागातील खंडोबा माळ, सॅंडविक कॉलनी, भोसरी गावठाणात जनसंपर्क आहे. त्याचप्रमाणे तरुणवर्गातही त्यांनी स्थान मिळविलेले आहे. तर, लांडगे हे भोसरी गावठाणात राबविलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत रुग्णालय, प्रदूषणविरहित स्मशानभूमी, विधी घाट, भाजी मंडई आदी प्रकल्पांमुळे परिचित आहेत. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आणि आमदार महेश लांडगे यांच्या अनुभवाची शिदोरी नगरसेवक लांडगे यांच्याजवळ आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यामुळे दत्ता गव्हाणे यांचा मतदारांशी संपर्क आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला भाजप सर करतो की पुन्हा राष्ट्रवादीचा शिलेदारच नगरसेवक होतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

नागरिकांच्या मागास प्रवर्गात (अ) "राष्ट्रवादी कॉंग्रेसने संतोष लांडगे, भाजपने माजी नगरसेवक संतोष लोंढे, तर "मनसे'ने महेश लोंढे यांना संधी दिली आहे. लांडगेंना तरुणांचा पाठिंबा दिसत असून, सामाजिक कार्याद्वारे लोंढे यांचाही जनसंपर्क आहे. 

लोंढे यांच्या पत्नी शुभांगी लोंढे या विद्यमान नगरसेविका आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गात (ब) राष्ट्रवादीतर्फे सोनम गव्हाणे, भाजपच्या सोनाली गव्हाणे, तर शिवसेनेकडून वेदश्री काळे रिंगणात आहेत. गोल्डमॅन कै. दत्ता फुगे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका सीमा फुगे या अपक्ष आहेत. सर्वसाधारण महिला (क) प्रवर्गात सुनीता लांडगे (राष्ट्रवादी), भीमाबाई फुगे (भाजप) आणि सुवर्णा लांडगे (शिवसेना) या उमेदवार आहेत. 

नगरसेवक शिंदे आणि आमदार लांडगे यांना मानणारा तरुणवर्ग प्रभागात मोठा आहे, तसेच पालिकेनेही येथे मोठे प्रकल्प राबविले आहेत. ते आपणच राबविल्याचा दावा नगरसेवक नितीन लांडगे करीत आहेत, तर ते आपल्या सत्ताकाळात झाल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा कोणाला झाला हे मतदानानंतरच दिसणार आहे. 

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM