मांजरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

मांजरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

मांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी जनतेत पोहचली आहे. २२ राज्यात सत्ता असतांनाच गेली पन्नास वर्षांत न झालेली कामे अवघ्या चार वर्षांत भाजपाने केली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप समोर कोणताही पक्ष टिकू शकत नाही.' असे परखड मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या सुमारे नऊ कोटींच्या निधीतून विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी आमदार योगेश टिळेकर, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष रोहिदास उंद्रे, नगरसेवक मारुती तुपे, विरसेन जगताप, नगरसेविका वृषाली कामठे, जिल्हा बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, जिल्हा दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, सन्मित्र बँकेचे माजी संचालक बबन घुले, सुदर्शन चौधरी, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमित घुले, अॅड. साईलेश म्हस्के, सदस्य पुरुषोत्तम धारवाडकर, बाळासाहेब घुले,नाना म्हस्के, प्रमोद कोद्रे, समीर घुले, उज्वला टिळेकर, निर्मला म्हस्के, संजय धारवाडकर, सुमित घुले, सीमा घुले, नयना बहिरट, सुनीता घुले, सुवर्णा कामठे, संदिप लोणकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य सरकार, पीएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून मांजरीच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, येथील सर्वसामान्य नागरिकांची अनाधिकृत घरे नियमित केली जातील, असे आश्वासन यावेळी बापट यांनी दिले.

आमदार टिळेकर म्हणाले, मांजरी गावाचा पाणी प्रश्न आणि रेल्वेगेटवरील उड्डाणपूलाचे काम वर्षभरात पूर्ण होत आहे. कार्यकर्त्यांसाठी हजारो खोटे गुन्हे जरी आपल्यावर दाखल झाले तरी खचून जाणार नाही, तर लोकांच्या विकासासाठी काम करत राहील.

गावातील मांजराई देवीला क दर्जा द्यावा. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या घरांना सात बारा उतारा मिळावा, सर्वसामान्य नागरिकांची अनाधिकृत घरे नियमित करावीत असा मागण्या यावेळी सरपंच शिवराज घुले यांनी पालकमंत्री बापट यांच्याकडे केल्या.

आमदार टिळेकर व सरपंच शिवराज घुले यांचे कौतुक

राज्यात फिरत असताना अशी ग्रामपंचायत पहिली नसून असा दूरदृष्टी असणारा सरपंच पाहिला नाही. सरपंचाकडे पाहिलं की अस वाटत काम करण्याचा दम आहे. तर आमदार योगेश टिळेकर यांचही चांगलं काम सुरू आहे, मात्र ज्यांचं डिपॉझिटही टिकणार नाही अशी लोकं  योगेशवर आरोप करत आहेत, त्यांना जनताच उत्तर देईल, अशा शब्दांत पालकमंत्री बापट यांनी आमदार टिळेकर यांची पाठराखण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com