पुण्यात शुक्रवारी महारोजगार मेळावा

Employment-Campaign
Employment-Campaign

मंचर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रस्ता पेठ पुणे, सॉफ्टझील टेक्‍नॉलॉजी प्रा. लि. पुणे आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी पुणे यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी आरटीओ कार्यालयाजवळ केनेडी रोड पुणे येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. 

या मेळाव्यासाठी पुणे जिल्हा, पुणे शहर व औद्योगीक परिसरातील एकूण १४० पेक्षा अधिक नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडील ९ हजार ६२५ रिक्तपदे त्यांनी कळविलेली आहेत. प्रामुख्याने सगळ्या प्रकारच्या पदविका (Diploma),  तंत्रनिकेतन (Polytechnic), पदवी (Graduation), पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक शिक्षण (Post Graduation & all Professional Qualifications) या सर्व प्रकारच्या पात्रतेसाठी ही पदे आहेत, अशी माहिती यासाठी वरील पात्रता धरण केलेल्या उमेदवारांनी महारोजगार मेळाव्याअंतर्गत खासगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन पवार व रिलेशनशिप मॅनेजर सॉफ्टझील टेक्‍नॉलॉजी प्रा.लि. पुणे व सहसंचालक ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी पुणे यांनी केले आहे. मेळाव्यांतर्गत महिला उमेदवारांना प्राधान्याने नामांकित उद्योजकांकडे रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ही कागदपत्रे आणावीत...
मुलाखतीस उमेदवाराने आपली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अर्जाच्या व आधार कार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या www.mahaswayam.in किंवा www.softzeal.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता या महारोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित आस्थापना/उद्योजक यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. काही आस्थापना या निवड झालेल्या उमेदवारांना ताबडतोब त्यांचे नियुक्त पत्र देणार आहेत. 
- अनुपमा पवार, साहायक संचालिका, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

पर्यटन क्षेत्रात काम करण्याची संधी
टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी स्कील कौन्सिल यांच्यामार्फत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटी आझम कॅम्पस कॅम्प गोळीबार मैदानाजवळ पुणे येथे गुरुवार (ता. २६) सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा पवार यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, ‘‘हॉस्पिटॅलिटी व टुरिझम सेक्‍टरमधील विवध पदांसाठी चांगल्या वेतनाचे रोजगार प्राप्त करून दिले जाणार आहेत. आवश्‍यकतेनुसार प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. 

मेळाव्याच्या ठिकाणीच हॉटेल, रेस्टॉरंट, रस्ते, जल, हवाई वाहतूक व पर्यटन या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. इयत्ता पहिली ते नववी पास किंवा नापास, दहावी पास-नापास, पदवीधर पास-नापास, शिक्षण घेतलेल्या व आयटीआयमधून प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन एअर कंडिशनिंग व रेफ्रिजरेशन रिपेअरिंग व मेंटेनन्सचे कोर्स केलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या १८ ये ३० वयोगटातील अकुशल, कुशल सक्षम दिव्यांग युवक युवतींना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com