पार्किंग पॉलिसी विरोधकांकडून अपप्रचार

bjp
bjp

वारजे माळवाडी : शहरात पार्किंग पॉलिसी ही पुणेकरांच्या विषय असल्याने त्यांना विश्वासात घेऊन करणार आहे. त्याचा विरोधी पक्षाकडून त्याचा अपप्रचार केला जात आहे. असे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. 

भारतीय जनता पार्टीच्या वारजे माळवाडी बूथ प्रमुखांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला गोगावले यांच्यासह तसेच भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, मतदार संघाचे समन्वयक विशाल वाळुंजकर, माजी नगरसेवक किरण बारटक्के, प्रवीण पाटील, जयदीप पारखी आणि माधव देशपांडे उपस्थित होते. 
पं दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजनेंतर्गत पुढील महिन्यात पक्षाचा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने मुंबई येथे राज्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. तसेच पुण्यात देखील कार्यक्रम होणार आहे. आगामी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बुथ प्रमुखांचा मेळावा होणार आहे. त्याचे नियोजन देखील गोगावले यांनी यावेळी सांगितले.

गोगावले म्हणाले, "राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्चीनार्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविल्या जात आहेत. तर कामगारांसाठी देखील योजना राबविल्या आहेत. त्याची माहिती देखील यावेळी कार्यकर्त्यांना सांगितल्या. गरोदर महिलेला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. या परिसरात त्या योजना अधिक प्रभावीपणे राबविता येईल.

अनासपुरे यांनी सांगितले की, "अशा प्रकारच्या अनेक विविध योजना, केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रभावी विकास कामे केली आहेत. विरोधकांकडून काहीच कामे झाली नाहीत. असे सांगून अपप्रचार केला जात आहे. आपल्याकडे प्रत्येक योजनेचा कोणी कधी लाभ घेतला याची सर्व माहिती उपलब्ध आहे."

प्रास्ताविक व स्वागत माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले. तर आभार मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी मानले.

या योजनाचा करा प्रचार 
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक अशा शक्ती केंद्राची निर्मिती, प्रधानमंत्री विमा योजना, मुद्रा कर्ज योजना, कौशल्य विकास योजना, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना, उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, कामगार योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, पुणे शहरात मेट्रो या गोष्टी प्रामुख्याने प्रभावीपणे राबविल्या जात आहे. त्याचा प्रचार वाढवा. असे गोगावले यांनी आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com