भाजपचा गटनेता दोन दिवसांत ठरणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता येत्या दोन दिवसांत निवडला जाणार आहे, तर महापौरपदासाठीचा उमेदवार तीन दिवसांत निश्‍चित होईल, असे पक्षातर्फे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महापौरपदासाठी बुधवारी (ता. 8) उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

पुणे - महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा गटनेता येत्या दोन दिवसांत निवडला जाणार आहे, तर महापौरपदासाठीचा उमेदवार तीन दिवसांत निश्‍चित होईल, असे पक्षातर्फे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, महापौरपदासाठी बुधवारी (ता. 8) उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

गटनेता दोन दिवसांत आणि महापौरपदाचा उमेदवार तीन दिवसांत निवडण्यात येणार असल्याच्या वृत्ताला पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दुजोरा दिला आहे. महापौरपदासाठी उमेदवार निश्‍चित करताना पक्षाचे निरीक्षक सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेविकांची संख्या वाढू लागली आहे. मुक्ता टिळक, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, नीलिमा खाडे, माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री नागपुरे, प्रा. ज्योस्त्ना एकबोटे, मंजुश्री खर्डेकर आदींचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, पक्षाचा महापालिकेतील गटनेता निवडण्याची प्रक्रिया रविवारपर्यंत पूर्ण होणार आहे. या पदासाठी सुनील कांबळे, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, मुरलीधर मोहोळ आदींची नावे चर्चेत आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठीही यातील बहुतेक जण इच्छुक आहेत. मात्र, स्थायी समिती अध्यक्षपद आणि सदस्यांच्या पदांचा निर्णय महापौर निश्‍चित झाल्यावर होणार आहे.

उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला देण्याचा सूर पक्षात असला तरी, महापालिकेतील पदांचे वाटप करण्याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय करण्यात येईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.

पुणे

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु...

05.09 PM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM