भाजपच्या सभागृहनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - महापालिकेच्या नव्या सभागृहातील भारतीय जनता पक्षाच्या सभागृहनेतेपदी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी भिमाले यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

पुणे - महापालिकेच्या नव्या सभागृहातील भारतीय जनता पक्षाच्या सभागृहनेतेपदी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची गुरुवारी नियुक्ती झाली. नवनिर्वाचित महापौर मुक्ता टिळक यांनी भिमाले यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

नव्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेतील अन्य पदांच्या नियुक्‍त्या करण्यात येत आहेत, त्यानुसार सभागृहनेते म्हणून भिमाले यांना पत्र देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेविका वंदना भिमाले यांच्यासह पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या आदेशानुसार भिमाले यांना नियुक्तीचे पत्र दिल्याचे महापौरांनी सांगितले. तर, "सभागृहातील सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांना विश्‍वासात घेऊन कामकाज केले जाईल,' असे भिमाले यांनी सांगितले. 

दरम्यान, महापौरपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी सकाळपासून महापौर मुक्ता टिळक यांनी कामकाजाला सुरवात केली. महापालिकेत आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत, त्या सोडविण्याबाबत लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील वाहतुकीच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच, टिळक यांचे अभिनंदन करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी महापालिकेत गर्दी केली होती. 

Web Title: BJP Leader Srinath bhimale appointed