अंधाऱ्या वाटेवरचा ‘सुरेल’ प्रवास

सुवर्णा चव्हाण - @Suvarna_Chavan
रविवार, 29 जानेवारी 2017

पुणे - त्यांचे आयुष्य अंधाऱ्या वाटेवरचे... तसेही संघर्षाचेच, जीवनानुभवही तोच, जगण्याची उमेदही तशीच... ते एकमेकांचे सच्चे दोस्त... कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी डेक्कन जिमखाना येथे गायन-वादन करणारे हे रस्त्यावरचे कलाकार. आयुष्यातील प्रकाश हरपला असला, तरी जगण्याचा स्वाभिमान त्यांनी सोडलेला नाही. रामदास गायकवाड आणि विनोद पवार अशी या मित्रांची प्रेरणादायी असलेली ही कहाणी. 

रामदास आणि विनोद हे दोघेही दृष्टिहीन आहेत. दोघेही उत्तम गायन-वादन करतात. त्यांच्या गायन-वादनातून दररोज उदरनिर्वाहापुरते पैसे मिळतात.

रामदास यांची मुलगी कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकते, तर मुलगा सातवीला. एका कंपनीत ते नोकरी करत होते. पण टायफाइडमुळे अंधत्व आले. त्यानंतर कोणी नोकरी न दिल्याने त्यांनी कलापथकात गायन-वादनाला सुरवात केली.याबाबत रामदास सांगतात, ‘‘दिवसभर गायन-वादन करून जे पैसे मिळतात ते आम्ही दोघे वाटून घेतो. रोज २०० ते ३०० रुपये मिळतात. पण ते पुरेसे नाहीत.’’

विनोद म्हणाले, ‘‘आम्ही सकाळी सात वाजता एकमेकांना फोन करतो. भेटण्याची वेळ ठरवतो आणि नियोजित ठिकाणी जाऊन गायन-वादन करतो. ’’

दृष्टिहीन ‘जय-वीरू’
ही आधुनिक काळातील ‘जय-वीरू’ची जोडी आहे. रामदास यांचे शिक्षण झालेले नाही, तर विनोद दहावीपर्यंत शिकले आहेत. दोघेही चाळीशीतले. यांची भेट कलापथकात झाली आणि मैत्रीचा एक बंध गुंफला गेला. रामदास निगडीला राहतात, तर विनोद उरुळी कांचनला; पण सकाळी साडेदहा वाजता एकत्र येऊन हे दोघेही कला सादर करतात.

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM

पुणे - जमीन, घर खरेदी विक्रीसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने मुद्रांकशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावर उपाय...

05.33 AM