मतदार प्रतिनिधीच्या नावावर बोगस मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - मतदार प्रतिनिधीच्या नावावरच बोगस मतदान झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात घडली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या महिलेने अखेर मतदानाचा हक्क बजावला. प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान घेऊन ते पाकीट मोहरबंद करण्यात आले.

पुणे - मतदार प्रतिनिधीच्या नावावरच बोगस मतदान झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात घडली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या महिलेने अखेर मतदानाचा हक्क बजावला. प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान घेऊन ते पाकीट मोहरबंद करण्यात आले.

उज्ज्वला शशिकांत पवार या हिंगणे बुद्रुक-सनसिटी या प्रभाग क्रमांक 34 मधील भाजी मंडई भागातील मतदान केंद्रामध्ये मतदार प्रतिनिधी होत्या. सकाळी साडेसहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांनी येथे काम केले. त्यानंतर त्या मतदानासाठी त्यांचे मतदान असलेल्या सनसिटी परिसरातील अग्निशामक केंद्राच्या परिसरात आल्या. तेथे रांगेत उभे राहून मतदार यादीतील अनुक्रमांक सांगितला; पण त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या नवावर दुसऱ्याच कोणी तरी मतदान केल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड हे कायदेशीर पुरावे असूनही त्यांना मतदान करता येणार नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत पवार म्हणाल्या, 'आमच्या दोघांच्या नावावर कोणी तरी मतदान केले होते. त्या स्वाक्षऱ्याही आमच्या नव्हत्या. त्याचा पुरावाही अधिकाऱ्यांना दिला; मात्र सुरवातीला अधिकाऱ्यांनी मतदानासाठी विरोध केला; पण नंतर त्यांनी प्रदत्त मतदार यादीत मतदान करून घेतले. त्यासाठी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्यात आला.''

केंद्र अधिकारी अश्‍विनी देशकर म्हणाल्या, 'या प्रकरणाची माहिती आम्ही तातडीने आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. नावात साधर्म्य असल्याने ही चूक झाली असल्याची शक्‍यता आहे. या केंद्रावर आलेल्या प्रत्येक मतदाराचा ओळखीचा अधिकृत पुरावा पाहून आणि त्याची खात्री करूनच मतदानास परवानगी देण्यात आली आहे.''

नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, या प्रशासनाच्या भूमिकेचे घटनास्थळी पोचलेल्या उमेदवार मंजूषा नागपुरे यांनी स्वागत केले.

पुणे

पुणे : "अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्षामागून वर्षे उलटत आहेत, मात्र...

11.39 AM

पुणे : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ जुनी सांगवीतील अरविंद...

10.48 AM

पुणे - "मुलगी शिकली, प्रगती झाली...' ही शब्दावली सार्थ ठरवीत अनेक मुलींनी घर,...

10.09 AM