बॉलिवूडच्या ‘अनटोल्ड’ स्टोरीज ऐका

चिन्मयी खरे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अन्नू कपूर यांची लाइव्ह कॉन्सर्ट येत्या शुक्रवारी (ता. ६) गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. ‘सकाळ’ या कॉन्सर्टसाठी माध्यम प्रायोजक आहे. त्यानिमित्ताने कपूर यांनी ‘सकाळ’च्या वाचकांशी साधलेला हा संवाद.

‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ आम्ही खरं तर फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात करतो. आतापर्यंत अमेरिकेत, हॉलंडमधले रॉटरडॅम अशा अनेक ठिकाणी ही कॉन्सर्ट झाली आहे. खरं तर या कॉन्सर्टचे परदेशात काही शो करून मी नुकताच परतलो आहे.

‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अन्नू कपूर यांची लाइव्ह कॉन्सर्ट येत्या शुक्रवारी (ता. ६) गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. ‘सकाळ’ या कॉन्सर्टसाठी माध्यम प्रायोजक आहे. त्यानिमित्ताने कपूर यांनी ‘सकाळ’च्या वाचकांशी साधलेला हा संवाद.

‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ आम्ही खरं तर फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात करतो. आतापर्यंत अमेरिकेत, हॉलंडमधले रॉटरडॅम अशा अनेक ठिकाणी ही कॉन्सर्ट झाली आहे. खरं तर या कॉन्सर्टचे परदेशात काही शो करून मी नुकताच परतलो आहे.

‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड ॲण्ड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’ म्हणजे जशी चित्रपटाची पटकथाच. पटकथा लिहिली जाते त्याचप्रमाणे संपूर्ण शोची मांडणी केलेली आहे आणि या शोमध्ये फक्त गाणी नाहीत, तर त्या गाण्यामागील कथा आणि रंजक किस्सेही आहेत. त्या किश्‍श्‍यांना अनुसरून गाणी येतात किंवा त्या किश्‍श्‍यांभोवती ही गाणी फिरतात. त्यामुळे गाणी हा मुख्य उद्देश नसून तर त्यामागच्या कथा, किस्से हा आहे.

या कॉन्सर्टमध्ये अमिताभ बच्चन, मीना कुमारी, रवींद्रनाथ टागोर, परवीन बाबी, उषा किरण अशा अनेक कलाकारांच्या कहाण्या आणि किस्से आहेत. आणखीही बरेच सेगमेंट्‌स आहेत. कॉन्सर्टमध्ये आम्ही संगीतकारांना आदरांजली वाहतो. गाणी, अभिनय, गीतकार यांच्याबद्दलही बोलतो.
पुण्यात मी साधारण चौदा वर्षांपूर्वी वगैरे परफॉर्म केले असेल. इतक्‍या वर्षांनंतर मी आता शुक्रवारी दुसऱ्यांदा परफॉर्म करणार आहे. खरे तर पुणे मला खूप आवडते; पण पुण्यातच माझे येणे जाणे खूपच कमी वेळा होते.

पुण्याची संस्कृती, त्याविषयी 
पुणेकरांना वाटणारी आस्था, साहित्य, पुण्याचा ऐतिहासिक वारसा सगळेच उच्च कोटीचे आहे. संस्कृतीची चांगली जाण असणाऱ्या पुणेकरांचा या कॉन्सर्टला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मला अपेक्षा नक्कीच आहे. मीही सध्या या कॉन्सर्टच्या तयारीत व्यग्र आहे.

बरीच, म्हणजे तब्बल बारा वर्षे मी "अंताक्षरी' ह्या शोचे सूत्रसंचालन केले तेव्हाही मी चित्रपटात काम करत होतो. चित्रपट दिग्दर्शित केला त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. कलाकार हा बहुमुखी असतो त्यामुळे एका वेळेला तो अनेक कामे कामे करू शकतो. हीच एका कलाकाराची खासियत असते. पण मी लोकांच्या विशेषतः तरूणांच्या लक्षात राहिलो ते "विकी डोनर' आणि "जॉली एलएलबी 2' या चित्रपटांमुळे. मी कलाकार म्हणून जन्माला आलो असलो तरी मी अनेक दिग्गज लोकांची गाणी ऐकली त्यामुळे किंवा "अंताक्षरी' या शोमुळे माझ्या गाण्याच्या कलेला आणखीनच प्रोत्साहन मिळाले, असेही म्हणायला हरकत नाही. या सर्व गोष्टींमुळेच मी एक चांगला कानसेन बनू शकलो. त्यामुळे कोणाकडेही गाणे न शिकता मला उत्तम गाता येते. ही किमया मी एक उत्तम कानसेन असल्यामुळेच घडू शकली. पण मी अजूनही स्वतःला कधी गायक म्हणून घेत नाही. मी कानसेनच आहे. मी या कॉन्सर्टची कुठेही जाहिरात करत नाही. केवळ रसिकांच्या प्रेमामुळेच ही कॉन्सर्ट आम्ही सातत्याने करू शकतो आहोत.

सनराइज ॲडव्हर्टायझिंग अँड इव्हेंट्‌स प्रस्तुत ‘ॲन इव्हिनिंग ऑफ टोल्ड अँड अनटोल्ड स्टोरीज ऑफ बॉलिवूड लाइव्ह इन कॉन्सर्ट’
शुक्रवार, ता. ६, सायं. ६ ते रा. ९
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेटजवळ
प्रवेशिकांसाठी संपर्क : सनराइज ॲडव्हर्टायझिंग, २० निर्मिती इमिनन्स, अभिषेक हॉटेलच्यावर, मेहेंदळे गॅरेजजवळ एरंडवणे. फोन -९८२३०३०२८३ किंवा ०२०-२५४५४७६५ (स. ९.३० ते सायं. ७)
फक्त सोमवारी (ता. २) आणि मंगळवारी (ता. ३) १० जणांचे ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना विशेष सवलत

Web Title: bollywood untold stories