ग्रंथविक्रेते एजंट हे सांस्कृतिक गुन्हेगार - रंगनाथ पठारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - ‘‘महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ विक्री योजना व्यवस्थित राबविल्या जात नसून, ग्रंथ विक्री क्षेत्रात एजंट निर्माण झाले आहेत. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या हाती निकृष्ट दर्जाचे साहित्य पडत आहे. अशाप्रकारे अनिष्ट पद्धतीने ग्रंथ विक्री करणारे एजंट हेच सांस्कृतिक गुन्हेगार आहेत,’’ असे मत साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.

पब्लिशिंग नेक्‍स्टतर्फे ‘बुक शॉप ऑफ द इयर’ या पुरस्काराने अक्षरधारा बुक गॅलरीला पठारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘पब्लिशिंग नेक्‍स्ट’च्या विनुथा मल्ल्या, मुकुल रणभोर उपस्थित होते. अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर, रसिका राठीवडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. 

पठारे म्हणाले, ‘‘चांगली दर्जेदार पुस्तके लोकांपर्यंत पोचली पाहिजेत; परंतु सरकारी ग्रंथ विक्री योजनांचा फायदा काही एजंट घेत आहेत. अनेक प्रकाशकांकडून ते सत्तर ते ऐंशी टक्के सवलतीत पुस्तके खरेदी करतात. शासनाकडून त्यांना खरेदीवर अनुदान मिळते. मात्र, सवलतीत खरेदी करून ग्रामीण भागातील ग्रंथालयांना ते पुस्तके विकतात. त्यामुळे लक्षावधी तरुणांचे वैचारिक नुकसान होत आहे. त्यांच्या हातात निकृष्ट दर्जाचे साहित्य पडते हे वास्तव आहे.’’ 

Web Title: book sailer agent criminal rangnath pathare