पुणे - सांगवीत गरीबांच्या मुलामुलींसाठी वही संकलन 

रमेश मोरे
सोमवार, 28 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींसाठी  वही संकलन उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील सातारा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

जुनी सांगवी (पुणे) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींसाठी  वही संकलन उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील सातारा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

जुनी सांगवी येथुन या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील गावातील शाळांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हे भेटीतुन  दुष्काळ, बेरोजगारी व नापीकीमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी, कष्टकरी, शेतमजुर मुलांना शाळेसाठी लागणारे वह्या पेन खरेदी करू शकणार नाहीत. अशा गरजुंना पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या सातारकरांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन एक डझन वह्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी संकलित करून त्यांना द्यावी असा उपक्रम संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरातुन राबविण्यात येत आहे.

यासाठी सातारा मित्र मंडळ सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरवने पुढाकार घेत या मुलांसाठी साठी "एक डझन व अधिक वह्या " प्रत्येक व्यक्तीने दान कराव्यात अथवा वही खरेदी करण्यास रोख रक्कम द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाचा कालावधी 10 जूनपर्यंत असून 
शिवाजीराव माने अध्यक्ष सातारा मित्रमंडळ सांगवी, सोमनाथ कोरे 
प्रकल्प कार्यकारी अधिकारी, आबा चव्हाण प्रकल्प समन्वयक, प्रकाश पाटील, महेश भागवत, संभाजी मोरे, सूर्यकांत बरसावडे चिंचवड विभाग, चंद्रकांत पवार यांच्याकडे वह्या संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर सतीश जाधव शिवसृष्टी उद्यानासमोर समोर जुनी सांगवी, सांगवी विकास मंच डॉ.भालेराव हॉस्पिटल समोर जुनी सांगवी येथे वह्या स्विकारण्यात येणार आहेत.

Web Title: books donation for poor students