कान्हे फाटा येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्यात यावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळाला जोडणाऱ्या कान्हे फाटा येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्यात यावा. तसेच ब्रिटीश कालीन इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. येथेही पूल उभारावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.  

मावळ तालुक्यातील प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे , तहसिलदार रणजित देसाई यांना विश्व हिंदु परिषद बजरंग दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कान्हे रेल्वे पुलाचे भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते परंतु, अद्यापही त्याचे काम सुरु झाले नाही.

इंद्रायणी नदीवरील पुल हा ब्रिटिश कालीन असुन त्या पुलाचे बांधकाम जीर्ण झाले आहे. त्याचा कार्यकाल संपला आहे. धोकादायक पुलांच्या यादीत याही पूलाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ब्रिटिश शासनाने या पुलाची क्षमता संपली असल्याचे पत्र पाठविले असल्याचा दावा बजरंग दलाने केला आहे. तरी देखील पुलाच्या पुर्ण बांधणीचे काम सुरु झाले नाही इंद्रायणी पुलावर कधीही दुर्घटना होऊ शकते. या दोन समस्यांमुळे टाकवे बुद्रुक येथील अनेक कंपन्या स्थलांतरीत झाल्या आहेत, केवळ या दोन कारणाने हजारो तरुण बेरोजगार झाले. राहिलेल्या कंपन्या देखील संलांतराच्या मार्गावर आहेत. रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या प्रश्ना बाबत लवकर कोणताही निर्णय झाला नाही तर विश्व हिंदु परीषद बजरंगदल रस्त्यावर उतरुन रेल रोको, रास्ता रोको अंदोलन घेतील, असा इशारा या निवेदनात दिला आहे. बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक संतोष भेगडे, जिल्हा कार्यध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री संदेश भेगडे, गोरक्षाप्रमुख अमित भेगडे, तालुका संयोजक बाळा खांडभोर, सह मंत्री महेंद्र असवले, अमोल पगडे, अध्यक्ष गोपिचंद कचरे, शहर संयोजक कुणाल साठे, अभिजित शिंदे, तानाजी असवले, मोरेश्वर पोपळे, किरण हवालदार, ओंकार भेगडे, पवन भंडारी, संजय शेळके, प्रविण फाकटकर, गणेश कुडे, सुशिल वाडेकर, खंडेराव गायकवाड आदिंच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: A bridge on the railway track at Kanhe Phata should be constructed