डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शैक्षिकणिक साहित्य आणावे 

मिलिंद संगई
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बारामती शहर - यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा पुष्पहाराऐवजी स्पर्धा परिक्षांची पुस्तके, वह्या व पेन घेऊन यावे, असे आवाहन बहुजन नायक प्रतिष्ठानच्या वतीने काळूराम चौधरी यांनी केले आहे. गरजू व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांना मदतीसाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन करत, स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हात पुढे करण्याचे आवाहन चौधरी यांनी केले आहे. 

अनावश्यक खर्च टाळून समाजाच्या प्रत्येक स्तरातील घटकांनी स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन किंवा तत्सम साहित्याची मदत केली तर ख-या अर्थाने ती मदत महत्वाची ठरणार असल्याचे चौधरी यांनी नमूद केले आहे. बुधवारपासून (ता. 11) ही मदत बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकानजिक स्विकारली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Bring educational material for the birth anniversary of DR. Ambedkar