ब्रिटिश कौन्सिलचा रोजगारावर भर

ब्रिटिश कौन्सिलचा रोजगारावर भर

पुणे - भारतीय तरुण-तरुणींना उत्कृष्ट इंग्रजीत बोलता यावे. त्यांना कौशल्याभिमुख रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील तीस हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाचकांना केव्हा व कोठेही पुस्तके वाचता यावीत. यासाठी ब्रिटिश लायब्ररीने एक लाख १५ हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. भविष्यातही डिजिटायझेशनवर अधिक भर राहील, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलच्या (पश्‍चिम भारत) संचालक हेलन सिल्व्हेस्टर यांनी दिली. 

ब्रिटिश लायब्ररीला फर्ग्युसन रस्त्यावरून शिवाजीनगर येथे स्थलांतरित होऊन वर्ष झाले. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हेलन बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘ शंभर देशांमध्ये कौन्सिलने लायब्ररीज (ग्रंथालय) स्थापन केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत एक लाख शिक्षकांना ‘स्पोकन इंग्लिश’चे धडे दिले आहेत. दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे. यासाठी कौन्सिलने बारा शैक्षणिक संस्थांशी भागीदारी केली आहे. कौन्सिलने शंभर भारतीय महिलांना शिष्यवृत्ती दिली आहे. त्यापैकी १४ महिला महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकार, टाटा ट्रस्ट आणि कौन्सिलच्या मध्ये झालेल्या करारानुसार येथील तरुणांना जागतिक स्तरावरचे ‘इंग्रजी संभाषण कौशल्य आणि रोजगारावरच कौन्सिलने लक्ष केंद्रित केले आहे.’’

वर्षभरात दोन हजार सदस्यांची नोंदणी
‘‘ब्रिटिश लायब्ररीचे साडेपाच ते सहा हजार सदस्य आहेत. त्यापैकी गेल्या वर्षभरात दोन हजार सदस्यांनी नोंदणी केली. लायब्ररीत दहा हजार पुस्तके, डीव्हीडी, इंग्लंड येथील वर्तमानपत्रे, मासिके आहेत. आतापर्यंत एक लाख १५ हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्यामध्ये १४ जर्नल्सही आहेत,’’ अशीही माहिती हेलन सिल्व्हेस्टर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com