कर कमी केले; पण पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्‍यता : सुभाष देसाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पिंपरी : 'पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत; पण आणखी भाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण आता कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत' अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. 

पिंपरी : 'पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत; पण आणखी भाव वाढण्याची शक्‍यता आहे. कारण आता कच्च्या तेलाचे दर वाढू लागले आहेत' अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (गुरुवार) व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. 

देसाई म्हणाले, "या अर्थसंकल्पाने माझ्यावर छाप सोडली. स्वामिनाथन आयोगातील शिफारसींची वचनपूर्ती करणार, असे सांगितले होते. त्यात उत्पादन खर्चापेक्षा दीड पट भाव देण्याचे तत्त्व होते. पण तीन वर्षे झाल्यानंतरही या सरकारने भाव दिला नाही आणि आता 2022 मध्ये हा भाव देऊ असे म्हणत आहेत. त्यामुळे आणखी चार वर्षे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करायला हवी; अन्यथा शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा थांबणार नाहीत.'' 

इंधनदराविषयी ते म्हणाले, "पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी केले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते. त्यावर कर लादण्यात आल्यामुळे आपण प्रत्यक्षात इंधनासाठी अधिक पैसे मोजत होतो. आता दर कमी झाले असले, तरीही कच्च्या तेलाचा भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडणार आहेत. सर्वसामान्य जनतेला ते खरेदी करणे शक्‍य होणार नाही आणि याचा ताण अर्थसंकल्पावर पडणार आहे.'' 

महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'! 

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018

बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! #Budget2018

अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस

देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?

5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली

#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र

2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली

अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Web Title: Budget 2018 Union Budget Arun Jaitley Lok Sabha 2019 Subhash Desai